छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी 2024 रोजी जयंती आहे या जयंतीस समाजातील वेगवेगळ्या घटकांना न्याय मिळावा या हेतूने काहीतरी अनोखी संकल्पना करत एक मोहीम राबवावी असा विचार इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे यांना आली.याबाबत श्रीराज भरणे यांनी आपल्या युवा सहकाऱ्यांना बरोबर घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दहावी व बारावी पास नापास विद्यार्थ्यांसाठी व बेरोजगारांसाठी SKF व TATA STRIVE कंपनी अंतर्गत ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये करिअर व नोकरीची सुवर्णसंधी शिबिर (मोफत) आयोजित केलेले आहे.या शिबिराविषयी युवानेते श्रीराज भरणे यांनी माहिती दिली ते म्हणाले की,”सदर ट्रेनिंग मोफत असणार आहे.सदर ट्रेनिंग 3 महिन्याच्या कालावधीसाठी पुणे येथे असणार आहे.ट्रेनिंगमध्ये सकाळी नाष्टा – दुपारी जेवण व रात्री जेवण सह – राहण्याची सोय मोफत असणार आहे.सदरचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर SKF व TATA STRIVE कंपनी अंतर्गत सर्टिफिकेशन दिले जाणार आहे.विद्यार्थी-विद्यार्थिनी या संधीचा लाभ घेऊन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये स्वताचे व्यवसाय सुरू करू शकतात किंवा कंपनी अंतर्गत जॉब करू शकतात अशी माहिती युवानेते श्रीराज भरणे म्हणाले.याबाबत अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.
Home Uncategorized शिवजयंती निमित्त बेरोजगारांना नोकरीची संधी:आमदार पुत्र श्रीराज दत्तात्रय भरणे यांची संकल्पना’..वाचा सविस्तर