शिर्डी येथील स्पर्धेत इंदापूरच्या खेळाडूंचा बोलबाला…! तब्बल 28 पदकांची कमाई करत इंदापूरचे नाव केले रोशन..वाचा सविस्तर.

शिर्डी येथे दिनांक 19 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान भव्य नॅशनल ट्रॅडिशनल रेसलिंग व पेनक्रेशन 2023 ही स्पर्धा पार पडली.
अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्यातील खेळाडूंनी नेत्रदीपक अशी कामगिरी करत चॅम्पियनशिप वर आपले नाव कोरले. इंदापूरच्या या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये 13 गोल्ड, 9 सिल्वर, 6 ब्रांझ पदक अशी एकूण 28 पदकांची कमाई केली. यामध्ये रोहित शिंदे गोल्ड 3,
आदित्य शिंदे गोल्ड 2 सिल्वर 1,श्रेयश काळे सिल्वर 1 ब्रांझ 1,कुणाल जाधव गोल्ड 1 सिल्वर 1,मनोज राठोड सिल्वर 2 ब्रांझ 1,अनुष्का गार्डे गोल्ड 2 ब्रांझ 1,कार्तिकी दिवसे सिल्वर 2 ब्रांझ 1,समीक्षा दिवसे गोल्ड 1सिल्वर,1ब्रांझ 1,ऋतुजा ढुके गोल्ड 3,शिवानी सूर्यवंशी गोल्ड 1सिल्वर 1 ब्रांझ 1 अशा पद्धतीने वैयक्तिक पदकांची कमाई करत इंदापूर तालुक्याचे नाव महाराष्ट्रात गाजवले.या स्पर्धेत संघ व्यवस्थापक म्हणून संस्थेच्या आधारस्तंभ असणाऱ्या प्रशिक्षक जयश्री व्यवहारे (मॅडम) यांनी काम पाहिले तर सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय व्यवहारे (सर) यांनी अभिनंदन केले. त्याचप्रमाणे तालुक्यातील या खेळाडूंनी इंदापूरचे नाव कानाकोपऱ्यात नेऊन इंदापूरचा नावलौकिक वाढवला याबद्दल भरतशेठ शहा व मुकुंदशेठ शहा, युवा नेते राजवर्धन पाटील यांनी खेळाडूंचे व प्रशिक्षक जयश्री व्यवहारे यांचे अभिनंदन केले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here