👉 प्रहारच्या रमेश पाटलांच्या पाठपुराव्याला यश.
टेंभुर्णी (प्रतिनिधी : राजाभाऊ लोंढे) दि.१८ :माढा तालुक्यातील शिराळ टें या पुनर्वसीत गावासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील यांच्या माध्यमातून १९७६ पूर्वीच्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पुनर्वसीत गावठाणांना १९९९(१८) प्रमाणे नागरी सुविधा पुरविण्यासाठी रस्ते आणि छोटे पुल अशा पाच कामांसाठी एकूण ४ कोटी ७१ लाख २४ हजार ४२ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. शिराळ टें, सुर्ली, आकोले खुर्द या तिन गावांना दळनवळाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.
वरील मंजूर कामासाठी शिराळचे सरपंच प्रतिनिधी बाळासाहेब ढेकणे, सुरली चे सरपंच सुरेश दादा पवार, अकोले खुर्द चे सरपंच प्रतिनिधी कांतीलाल नवले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका युवा अध्यक्ष संभाजी (गोटु)पाटील, मार्केट कमिटीचे माजी संचालक संतोष आण्णा पाटील यांनी प्रहार संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील यांच्यासमवेत जलसंपदा राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्याकडे पाठपुरावा केला.
उजणी प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकर्यांना पक्के आणि कायम रस्ते नसल्याने दळनवळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. ठिकठिकाणी उजणी प्रकल्पाचे पाणी भरत असल्याने कमी अंतरावर जाण्यासाठी ८ ते १० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत होते वरील मंजूर कामांमुळे शेतकर्यांची कायमची गैरसोय टळणार आहे.
– रमेश पाटील उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष
👉 उजनी जलाशयावर होणार हवाई विमानतळ – पहा समोरील लिंक ओपन करून https://youtu.be/99ET1xSrEXo