शिरसोडीचे सौदागर पाडुळे यांची अखिल भारतीय मराठा महासंघ शेतकरी आघाडी इंदापूर तालुका अध्यक्षपदी निवड.

श्रीक्षेत्र बोरमलनाथ मंदिर केडगाव चौफुला याठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा गुणवंत मान्यवरांचा सत्कार समारंभ व विविध तालुक्यांचा पद नियुक्ती समारंभ पार पडला. यावेळी सौदागर पाडुळे यांची इंदापूर तालुका अध्यक्ष शेतकरी आघाडी मराठा महासंघ निवड करण्यात आली.
त्यांना निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट शशिकांत आप्पा पवार, राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, राष्ट्रीय युवक प्रतिनिधी दशरथ पिसाळ, शिवधर्म फौंडेशन संस्थापक अध्यक्ष पै दिपकआण्णा काटे ,राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, राज्य उपाध्यक्ष एडवोकेट कैलास पठारे, राज्य युवक संघटक करणसिह रणवीर, राज्य युवक संयुक्त सरचिटणीस उदयसिह पाटील,जिल्हा अध्यक्ष प्रशांत वांढेकर, पुणे जिल्हा शेतकरी आघाडी अध्यक्ष विशाल कुंजीर, हवेली तालुका अध्यक्ष अतुल भाऊ मोरे यांच्या हस्ते देण्यात आले.त्यांच्या निवडीची शिफारस अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष मयूर आबा सोळसकर यांनी केली.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून सोडवू असे पाडुळे यांनी आपल्या निवडीनंतर सांगितले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here