प्राधान्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड लशीकरण करण्यात यावे- इंदापूर युवासेना

इंदापूर: मा.मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या महत्वकांशी बिगीन अगेन अंतर्गत “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी”अभियानांतुन शिक्षणाची गंगा राज्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व घटकांनी जोमाने काम सुरू करावे यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला कोविडचे लसीकरण व्हावे म्हणून महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मा.ना.आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे सर्व युवासैनिक प्राधान्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड लशीकरणासाठी तत्पर राहतील. तरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र मार्फत लसीकरण उपक्रम राबवून प्राधान्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड लशीकरण करण्यात यावे. याबाबत इंदापूर युवा सेनेच्या वतीने मा.डॉ.सरतापे साहेब तालुका आरोग्य अधिकारी,पंचायत समिती इंदापूर यांना निवेदन देण्यात आले.
प्रसंगी युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज सानप, उपजिल्हा युवा अधिकारी कुलदीपभैय्या निंबाळकर, तालुका युवा अधिकारी सचिन इंगळे, तालुका समन्वयक विनायक लोंढे, उपतालुका युवा अधिकारी योगेश हरीहर व युवासैनिक उपस्थित होते.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here