इंदापुर ता.प्रतिनिधी. सचिन शिंदे.
शिक्षक समितीच्या इंदापूर व बारामती शाखेतील शिक्षकांकडून प्रांत अधिकारी बारामती यांना विविध मागण्याचे निवेदन सादर.
दि 1 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने संपूर्ण राज्यभर प्रांत अधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध प्रलंबीत मागण्या संदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले.शिक्षक समितीच्या इंदापूर व बारामती शाखेतील शिक्षकांनी जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर , जिल्हा शिक्षक नेते सुनिल वाघ , ज्ञानदेव बागल , आबा जगताप यांचे नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी कार्यालय बारामती येथे शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून धरणे आंदोलन केले व सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणेश द्यावा , उपस्थिती भत्ता २५ रु करावा , जुनी पेन्शन योजना लागू करावी , एमएससीआयटी अट रद्द करावी , सातव्या वेतन आयोगातील ञुटी दूर कराव्या , शिक्षकांच्या बदल्या कराव्या अशा विविध मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी यांना दिले.
शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्या समस्या सोडवण्याची धमक फक्त शिक्षक समिती मध्येच आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीत तीव्र आंदोलन करून शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावले जातील यासाठी शिक्षकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले.यावेळी सुनिल वाघ , ज्ञानदेव बागल , किरण म्हेञे , बापूराव जाधव , मुकुंद गाडे , विजय पाटील , जुनी पेन्शन इंदापूरचे तालुका अध्यक्ष संतोष हेगडे यांनी विविध प्रश्न मांडले. यावेळी शिक्षक नेते हरिश काळेल , सुनिल शिंदे , सिद्धार्थ चव्हाण , नितीन वाघमोडे , सुनिल चव्हाण , संभाजी काळे , नजीर शिकीलकर , शफिक शेख विनय मखरे , भारत ननवरे , सुभाष भिटे , विकास भोसले , हनुमंत दराडे , अरूण मिरगणे , विलास पानसरे , मोहन भगत , सुनिल कोकाटे , सतिश खटके , भुषण जौंजाळ , दिलीप पोळ , शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक शिक्षक समिती बारामतीचे अध्यक्ष आबा जगताप यांनी केले. सुञसंचालन सचिन हिलाल यांनी केले व आभार प्रमोद कुदळे यांनी मानले.