ता.प्रतिनिधी. सचिन शिंदे
शिक्रापूर ता.शिरूर.जि.पुणे.येथील पुणे नगर रोड ते माळवस्तीकडे जाणारा व त्या रस्त्यालगतचा गट नंबर 474 च्या गटातील माजी सैनिक श्री.एकनाथ महाळु महाजन यांच्या राहत्या घराकडे येणाऱ्या रस्ता स्थानिकने वीट बांधकाम करून बंद केला. तहशील कोर्टात धाव घेतली असता रस्ता खुला करण्याचे आदेश तहशील यांनी दिला तरी ही अजून रस्ता स्थानिकानी खुला केला नाही.
माजी सैनिक श्री.एकनाथ महाळु महाजन रा.शिक्रापूर ता.शिरुर जि.पुणे.यांनी मोजे शिक्रापूर येथील जमीन गट क्रमांक 474 मधील 3267 चौ.फुट क्षेञ स्थानिक श्री.ज्ञानेश्वर नारायण करंजे कडुन खरेदी केली आहे.सदर क्षेञात जाणेयेणेसाठी रस्त्यास श्री.ज्ञानेश्वर नारायण करंजे यांनीच अडथळा केला असलेने श्री.एकनाथ यांनी मे.दिवाणी व फौजदार न्यायालय घोडनदी यांचे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.न्यायालयाने आदेश क्रमांक आरसीएस/133/2021 श्री.एकनाथ यांच्या घराला जाण्या-येण्यासाठी रस्ता 10 फुट दयावा व रस्त्याच्या रुंदीकरण हरकत नाही असा आदेश दिला आहे.तहशील यांनी असा आदेश येऊन सुध्दा त्यांना अद्याप रस्ता स्थानिक नी दिला नाही.यांना रस्त्यामुळे खुप मानसिक ञास व गैरसोय होत आहे.वरील प्रमाणे सर्व हकीकत व भावना एकनाथ महाजन यांनी सांगितली या माजी सैनिक श्री.एकनाथ यांना होणाऱ्या ञासाला सगळ्यां स्तरावरून माजी सैनिक संघटना नी नाराजी व्यक्त करत पाठिंबा दिला आहे असेेेेे एकनाथ महाजन यांनी सांगितले.