शासनाचा जबरी आदेश…शेतकरी थकबाकीदार असेल शेतकऱ्यांच्या नावाची गावामध्ये दवंडी, ग्रामपंचायत मध्ये प्रसिद्ध होणार नावे,शासनाचा शेतकऱ्याकडून कर्जवसुलीचा फंडा.. शेतकऱ्यांनो वाचा सविस्तर.

उपसंपादक: संतोष तावरे.
शेतकऱ्यांनो तुम्ही बँक आणि सोसायटीचे थकबाकीदार राहिलात तर त्या शेतकऱ्यांची नावे आपल्याच गावात चावडीवर दवंडी देऊन घोषित करण्यात येणार आहेत आणि ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर देखील थकबाकीदार शेतकऱ्यांची नावे लागणार आहेत असा आदेश सहकार आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे काढला आहे. यासंबंधीचा कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.कृषी कर्ज वसुली बाबत सहकार आयुक्तांनी कर्ज वसुलीचा कृती आराखडा तयार करून ऑक्टोंबर पर्यंत आराखड्यानुसार अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. सोसायटीचे संचालक मंडळांनी थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी तयार करून चावडीवर प्रसिद्ध करायचे आहे.ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर देखील ही यादी लागणार आहे. थकबाकीदार राहणाऱ्या शेतकऱ्यांची गावात दवंडी द्यायचे आहेत तसेच तालुक्याच्या ठिकाणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी बड्या 100 थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी बाजार समिती सोसायटी नोटीस बोर्ड, बँक नोटीस बोर्ड येथे प्रसिद्ध करायचे आहे .आणि वर्तमानपत्रातही ही नावे प्रसिद्ध करायचे आहेत असा आदेश सहकार आयुक्तांनी सोसायटीला दिला आहे .त्यामुळे शेतकऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
👉एकीकडे शेतकरी वर्ग हा मेटाकुटीला आलेला दिसतो आहे. हमीभाव मिळत नाही नैसर्गिक अडचणीचा ही तो सामना करत आहे. रासायनिक खतांचे दर, औषधांचे दर गगनाला भिडले आहेत. याकडे लक्ष न देता प्रशासन मात्र शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याच्या तयारीत आहे .शेतकऱ्यांची इज्जत घालवण्याच्या तयारीत आहे. 👉 जनता एक्सप्रेस मराठी न्यूजचे उपसंपादक संतोष तावरे यांच्याशी बोलताना शेतकरी संघटनेचे नेते पांडुरंग रायते म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जाची दवंडी दिल्यास चाबकाने फोडून काढू स्वतः आयुक्तांनी चार दोन गावात कर्ज वसुलीसाठी दवंडी द्यायला यावं मग आमचा आसूड आणि त्यांची पाठ असणार हे नक्की , पुढे रायते म्हणाले शेतीमालाला भाव मिळू न देता सरकार असं वागणार असेल तर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड कसा असतो हे नक्की दाखवून देऊच.शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यावर गप्प का? असा सवाल रायते यांनी उपस्थित केला. थकबाकीदार शेतकऱ्यांची गावांमध्ये दवंडी दिली तर शेतकऱ्याचा अपमान होणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार आहेत. जर मोठ-मोठ्या उद्योगपतींचे ,सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाबाबत काही न करता फक्त शेतकऱ्यांच्या पाठीमागे तुम्ही असे लागाल तर आमचा आसूड आणि त्यांची पाठ असणार हे मात्र नक्की असे रायते म्हणाले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here