तहसिलदार श्रीकांत पाटील,अनिल ठोंबरे,डॉ.शेळके यांनीही केले रक्तदान.
इंदापूर : पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुका हा आपल्या वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिला आहे. आज या तालुक्याच्या शासकीय विभागाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरातही बाजी मारली आहे.महाराष्ट्र राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार इंदापूर तालुक्यातील सर्व शासकीय विभागाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शहा संस्कृतिक भवन या ठिकाणी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात 159 बॅगचे संकलन करण्यात आले.159 बॅग संकलन करत पुणे विभागात इंदापूर तालुका अग्रेसर राहिला आहे.आज बुधवारी दि.22 रोजी इंदापूर तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते नायब तहसिलदार अनिल ठोंबरे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुहास शेळके,सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ.रामचंद्र शिंदे,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे उद्घाटन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात इंदापूर तालुक्यातील विविध शासकीय विभाग सहभागी झाले होते.तहसिलदार श्रीकांत पाटील,वैद्यकीय अधिक्षक डा.सुहास शेळके,सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र शिंदे,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे,नायब तहसिलदार अनिल ठोंबरे,उपअधीक्षक भूमी अभिलेख रवींद्र पिसे, गटशिक्षणाधिकारी इंदापूर राजकुमार बामणे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनगर,तलाठी सचिन करगळ यांसह अनेक अधिकारी व कर्मचारी,विविध गावचे पोलिस पाटील यांनी रक्तदान करुन महान कार्यास आपला हातभार लावला. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक यांनीही मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला असल्याचे दिसून आले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी सुनील गावडे, इंदापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय शहा,वसंत माळूजकर,भिगवन रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे, वरकुटे रोटरीचे अध्यक्ष डहाशिकांत शेंडेभिगवनचे नामदेव कुदळे, माळवाडीचे पोलीस पाटील अमोल व्यवहारे,हिंगणगांवचे हारद पाटील,नेताजी मित्र मंडळाचे अध्यक्ष शुभम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.या रक्तदान शिबिरासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी कार्यालय मोफत दिले. तर मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूर चे अविनाश ननवरे व त्यांचे कर्मचारी यांनी रक्त संकलीत करुन योगदान दिले.
महत्वाचे
महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेला इंदापूर तालुक्यातील चिंकारा हरीण शिकार प्रकरण पहा सविस्तर खालील लिंक👇