👉 शाळा सुरू होऊन चार महिने झाले तरीही शाळा व्यवस्थापन समिती स्थापन न झाल्याने पालक संतप्त.
उपसंपादक निलकंठ भोंग
इंदापूर तालुक्यातील जास्त विद्यार्थी असलेली शाळा म्हणून निमगांव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालय या शाळेकडे पाहिले जाते. या शाळेत जवळपास दोन हजारहून अधिक विद्यार्थी आपले शिक्षण घेत आहेत. इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत विद्यार्थी येथे कला, विज्ञान तसेच व्यावसायिक विभागाचे शिक्षण घेत असतात. शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा भरल्यापासून तीन महिन्याच्या आत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे बंधनकारक असताना निमगांव केतकी येथील श्री. केतकेश्वर विद्यालयात मात्र शासनाच्या परिपत्रकाचा अवमान केल्याचे पहावयास मिळत आहे. शाळा चालू होऊन चार महिने झाले तरीही या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. (दि. १७ शनिवार) पालकांच्या आग्रहाखातर पालक मीटिंग घेण्याचे ठरले. मात्र या पालक मीटिंगमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन झाली नाही. त्यामुळे काही पालक संतप्त झाले. शाळा सुरू झाल्यापासून ही पहिली पालक मिटिंग असल्याने या मीटिंगमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे गरजेचे असताना या संदर्भात काही पालकांनी सूचना मांडूनही त्याचा विचार केला गेला नाही.वारंवार पालकांनी या संदर्भात पाठपुरावा करूनही येथील शिक्षक का हा निर्णय घेत नाहीत.कोणाच्या दबावामुळे तर हा निर्णय होत नाही ना अशी चर्चा दबक्या आवाजात पालकांमध्ये आहे.
या शिक्षकांविरोधात लवकरच शिक्षण मंडळ तसेच जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे काही पालकांनी सांगितले.
Home Uncategorized शाळा व्यवस्थापन समिती कधी स्थापन करणार? पालकांची मागणी!निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर...