काल दिनांक 5 सप्टेंबर रोजी बावडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील यांना एक गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती होती ती गाईंना निर्दयीपणे आयशर टेम्पोमध्ये कोंबून कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या बारामती व इंदापूर तालुक्यातील आरोपींची. बारामती ते सोलापूर जिल्ह्यात बावडा मार्गे अवैधरित्या कत्तलीसाठी आयशर टेम्पोमध्ये 12 जनावरे घेऊन जाण्याची बातमी समजताच बावडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी याबाबतची माहिती इंदापूरचे पोलीस निरीक्षक श्री मुजावर साहेब यांना दिली.पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार काझी,पोलीस नाईक जगन्नाथ कळसाईत, सलमान खान, पोलीस शिपाई आरिफ सय्यद, विनोद काळे या सर्व टीमने बावडा येथील पाटील पेट्रोल पंपाशेजारी सापळा रचून रात्री 9 वाजता आयशर टेम्पोसह दोन आरोपींना पकडले.नवाज ख्वाजा शेख (चालक) हा बारामती तालुक्यातील मेखळी गावचा तर त्याचा साथीदार रमजान ख्वाजा शेख हा इंदापूर तालुक्यातील लासुरने गावचा. या दोघांना पकडून 11 जर्सी गाई व 1 देशी गाई यांची सोडवणूक करण्यात पोलिसांना यश मिळाले.सदरच्या बाबत पोलिसांनी आणखी माहिती घेतली असता ह्या गाई बारामतीहून आणल्या होत्या अशी माहिती मिळाली. सदरच्या गाईंना सरसेनापती हंबीरराव मोहिते पांजरपोळा सासवड येथे पोहोचवण्यात आल्या तर आयशर टेम्पो बावडा दूर क्षेत्र येथे आणून प्राणी संरक्षण अधिनियम व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकूणच साधारण 96 हजार रुपयांच्या गाई व 10 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 10 लाख 96 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला होता.गेल्या आठवड्यातच शिवसेनेने इंदापूर पोलीस स्टेशनला याच बाबत एक निवेदन देऊन खुलेआम असे अवैध धंद्यावर चाफ आणावा असे निवेदन दिले होते .गेल्या काही दिवसापासून इंदापूर पोलिस स्टेशनची कामगिरी दमदार स्वरूपाची झालेली दिसून येत आहे.अनेक चोरीप्रकरणी उघडकीस करून मुद्देमाल हस्तगत करणे,बेकायदेशीर गोमांस,दरोडा अशा गोष्टी नियंत्रित आणून एक प्रकारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात इंदापूर पोलिस स्टेशन यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करून सामान्य लोकांना एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न इंदापूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सिंघम अधिकारी मुजावर साहेब यांच्या माध्यमातून होत आहे त्याचबरोबर त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील सारखे शिस्तबद्ध अधिकारी लाभल्याने इंदापूर तालुक्यात सध्या तरी कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे.
Home Uncategorized शाब्बास पोलीस… 12 गाईंना निर्दयीपणे टेम्पोमध्ये कोंबून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्यांना इंदापूर पोलिसांनी...