इंदापूर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती या ठिकाणी केले होते.शुक्रवार दि.6 ते 8 जानेवारी 2023 रोजी 14 वर्षे वयोगटामध्ये पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करीत असलेल्या डॉ. कदम गुरुकुल इंदापूर मुलांच्या संघाने प्रथम फेरीत अहमदनगर शहर संघाचा 12/2 ने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये पिंपरी चिंचवड शहर संघाचा 7/0 ने पराभव करून अंतिम फेरी प्रवेश केला.अंतिम सामना हा पुणे जिल्हा विरुद्ध सोलापूर जिल्हा या संघामध्ये खूप चुरशीची लढत होऊन पुणे जिल्हा संघाने सोलापूर जिल्हा संघाचा 5/1 ने पराभव करून विभागीय शालेय बेसबॉल स्पर्धेमध्ये सलग चौथ्या वर्षी विजेतेपद पटकाविले.डॉ.कदम गुरुकुल इंदापूर 14 वर्षे मुलांचा संघ बीड जिल्हा या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. खेळाडू व्यंकटेश शेटे,ओम अडसुळे,वेदांत देवकर,शिवराज शेरकर,तेज कचरे,पृथ्वीराज कांबळे,वेदांतराजे साळुंखे,यश शिंदे,चेतन बनकर,वेदांत सपकळ,रविराज पवार,नवीश यादव,रिदान मुलाणी,यश शिंदे या खेळाडूंचे आणि मार्गदर्शक क्रीडाशिक्षक सोमनाथ नलवडे यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे साहेब,इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले साहेब यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. एल. एस. कदम सर संस्थेच्या शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम मॅडम,सचिव नंदकुमार यादव सर,गुरुकुलच्या प्राचार्या वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्य ऋषी बासू, कनिष्ठ विभाग प्रमुख अनिता पराडकर मॅडम,स्कूल मॅनेजर संदीप जगताप सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Home Uncategorized शाब्बास…! डॉ. कदम गुरुकुल इंदापूर मधील 14 वर्षे वयोगटाच्या(मुले) बेसबॉल संघाची राज्यस्तरीय...