इंदापूर: विद्यानिकेतन प्रोफेशनल ॲकॅडमी इंदापूर या संस्थेने वर्षभरातच शिक्षणक्षेत्रात दर्जेदार कामगिरीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.संस्थापक अध्यक्ष प्रा.कुणाल काळे यांनी पुणे, अमेरिका, जर्मनी इ. ठिकाणी अभियांत्रिकी व शैक्षणिक क्षेत्रात काम केले आहे. कोरोना महामारी काळात प्रथमच ग्रामीण भागात राहिल्याने व शैक्षणिक क्षेत्रातिल पिछेहाट पाहून जुन २०२१ ला इंदापूर या ठिकाणी अकॅडेमीची स्थापना केली.आजपर्यंत केवळ ॲकडमी मार्फत NEET, JEE, CET या परीक्षांच्या तयारी साठी सुविधा उपलब्ध नसल्याने विदयार्थी लातूर व कोटा अशा ठिकाणी जायचे.शैक्षणिक वर्ष २०२१-२२ आमच्या ॲकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी ( शैक्षणिक कोर्स ठरवून आणि त्याप्रमाणे ध्येय प्राप्ती करून ) तालुक्यात राहून उत्तुंग यशशिखर गाठून नवा आदर्श निर्माण केला आहे.कु.अपुर्वा मुळीक (Dr. BPTh ) कृष्णा इन्स्टिट्यूट कराड प्रवेश परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम ( Rank-1), अभिलाषा चव्हाण (AIFSET) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे National Forensic Science University गुजरात, कु. ऋतूजा बल्लाळ (Dr. BPTh), चि. माऊली चव्हाण(Dr. BPTh), चि. आदित्य गोफणे Mechatronics Symbiosis Pune. सर्वजण जागतिक कीर्तीच्या विद्यापीठात प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जनता एक्सप्रेस मराठी न्यूजचे संपादक श्रीयश नलवडे , अनिल गुळूमकर(उद्योजक अनिल डिजिटल),ॲडव्होकेट चव्हाण साहेब, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.ॲकॅडमी चा शैक्षणिक दर्जा सर्वोच्च राहण्यासाठी लातूर-कोटा पॅटर्न प्रमाणे अद्ययावत साॅफ्टवेअर सिस्टीम्स, ३००० स्के फूट मध्ये वातानुकुलित(AC) डिजिटल क्लासरुम, भारतातील नामांकित प्रकाशने Study material, स्वतंत्र अभ्यासिका इ. पुण्यातील संस्थांपरमाणे सुविधा उपलब्ध आहेत.जर्मनी, अमेरिका येथील प्रा. काळे सर यांच्या अनुभवातून अंर्तगत गुणवत्ता, नियमन व नियंत्रण विभाग, हि संकल्पना शिक्षण क्षेत्रात प्रथमच संस्थापित करून त्याचे काटेकोर केले जात आहे अशी माहिती विभाग प्रमुख प्रा.प्रकाश धाईंजे यांनी दिली. संस्थेच्या सचिवा प्रा. काळे मॅडम स्वत उच्चशिक्षीत असुन सर्व गोष्टींचे व्यवस्थापन पाहतात.अशाप्रकारे चे आधुनिक शिक्षणाच्या सोयी प्रथमच इंदापूर भागात उपलब्ध झालेने व यशस्वी विद्यार्थ्यांची कामगिरी पाहता सुशिक्षित पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.कु.कोमल,कु.ऐश्वर्या,श्रेया, चि. ज्ञानेश्वर,प्रणव राजगुरू यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.