इंदापुर: सुनीता भरत घोगरे लाखेवडी बिट मधील चव्हाणवस्ती,शेटफळ हवेली, येथे 2006 पासून अंगणवाडी सेविका या पदावर कार्य करत आहेत.
मध्यमवर्गीय कुटुंबातून असुन स्वाभिमानी, मनमिळाऊ स्वभाव आणि आपल्या कामातून समाजसेवा (आरोग्य विभागातील स्कीम विषयी माहिती, नवजात बालक, त्यांच्या माता याना आरोग्य काळजी, लसीकरन याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन करतात.)
एकंदरीत उत्कृष्ट कामगिरी असल्याने त्यांच्या बिट मध्ये नेहमीच कौतुकाला पात्र असतात अशी माहिती सुप्रवायजर सय्यद मॅडम यांनी दिली.
याच सर्व गोष्टींची दखल घेत शांतिसूर्य सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आदर्श अंगणवाडी सेविका हा पुरस्कार देण्यात आला. सोबत प्रमानपत्र देण्यात आले. यांसंर्भात घोगरे मॅडम याना विचारले असता अतिशय भावूक होऊन याच श्रेय देवघरची फुले असणारी त्यांचे विद्यार्थी आणि मदतनीस आरडे याना दिले. आणि शांतिसूर्य सोशल फाउंडेशन आणि सर्वांचे आभार मानले. यापुढेही तसेच काम चालू राहणार असल्याचेही सुनिता घोगरे यांनी सांगितले.