शहा गावामध्ये ‘आमदार केसरी’ बैलगाडा शर्यत उत्साहात पार,अण्णा पाटील यांच्या बैलगाडीने पटकावला प्रथम क्रमांक.

शहा ता. इंदापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व मा.राज्यमंत्री इंदापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार श्री. दत्तात्र मामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती .आयोजक पै. श्री विश्वजीत भैय्या मारकड आणि पैलवान अमोल (सोनू) अण्णा पाटील यांनी खूप सुंदर असे बैलगाडा शर्यतिचे आयोजन व नियोजन केले होते.या वेळी ही बैलगाडा शर्यत डोळ्याचे पारणे फेडण्यासारखी होती, या ठिकाणी आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी स्वतः उपस्थित राहून बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला, यावेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावरून जवळपास २०० बैलगाडी शहा येथे शर्यतीसाठी आले होते.यामध्ये प्रथम क्रमांक श्री अण्णा पाटील यांच्या बैलगाडीने पटकावला तसेच इतर सहा बैलगाडी मालकांना ट्रॉफी तसेच बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले,यावेळी कार्यक्रमाला सहकार्य करणारे श्री विष्णू आबा पाटील श्री अशोक नाना पाटील श्री दिलीप बापू पाटील तसेच इतर सर्व मित्र परिवार यांनी खूप प्रयत्न करून ही बैलगाडा शर्यत उत्साहात पार पाडली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here