शरद पवार साहेबांचे विश्वासू तथा वडापुरीचे दिग्गज व्यक्तिमत्व हनुमंत बापूराव जगताप (तोबरे आण्णा) यांना मार्केट कमिटीत मिळणार स्थान? तालुक्यात चर्चा.

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही आता रंगतदार अवस्थेत येणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत 146 जणांनी या निवडणुकीच्या रिंगणात सहभाग घेतला आहे.
असे असले तरी इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावचे हनुमंत बापूराव जगताप उर्फ तोबरे आण्णा यांना मात्र आप्पासाहेब जगदाळे व आमदार भरणे मामा हे आपल्या पॅनलच्या माध्यमातून साथ देतील अशी लोकांना आशा आहे.तोबरे अण्णा यांचे वय वर्ष 80 असून ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात साधारण 60 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून काम करत असून वडापुरी व पंचक्रोशीत त्यांची लोकप्रियता व नावलौकिकता अखंडित तथा अविरत आहे.त्यांचा इतिहास जर पाहिला गेला तर त्यांच्या वडिलांकडूनच सामाजिक व राजकीय क्षेत्राची आवड त्यांच्यात निर्माण झालेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब यांची त्यांनी आतापर्यंत साथ सोडलेली नाही.


1987 साली वडापुरी परिसरात पाण्याची कमतरता भासत असल्याने शेतकरी अडचणीत आला होता आणि याच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तोबरे अण्णांच्या माध्यमातून 1000 एकर क्षेत्रासाठी श्रीनाथ पाणी पुरवठा संस्था त्यांनी स्थापन केली व वडापुरी पंचक्रोशीतील शेती सुजलम-सुफलम केली. याच श्रीनाथ पाणीपुरवठा संस्थेचे ते सलग 30 वर्ष चेअरमन होते.
समाजातील सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचे काम त्यांनी अखंडितपणे केले आणि त्यामुळेच वडापुरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सलग 2 वेळा जनतेने त्यांना निवडून दिले. तसेच या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी तब्बल 25 वर्ष त्यांनी काम पाहिले. वडापुरी येथील श्रीनाथ मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे.याच देवस्थानचे ते तब्बल 35 वर्ष अध्यक्ष आहेत. वडापुरी गावचे 5 तंटामुक्ती अध्यक्ष असताना गावासाठी 7 लाख रुपये बक्षीस मिळवण्यात आण्णा यशस्वी झाले होते.


बारामती लोकसभा निवडणूक असेल किंवा इंदापूर विधानसभेची निवडणूक या सर्व निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास मताधिक्य देण्याची प्रमुख जबाबदारी ही तोबरे आण्णा पार पाडत असत. वडापुरी,अवसरी,भांडगाव, बेडसिंग, बाभुळगाव,गलांडवाडी, सुरवड, पंधारवाडी, झगडेवाडी,शेटफळ हवेली,अवसरी, झगडेवस्ती,शहा, विठ्ठलवाडी, सुरवड ,सरडेवाडी, कांदलगाव या परिसरातील लोकांशी तब्बल 60 वर्ष दांडगा संपर्क तोबरे अण्णांचा आहे. त्यामुळे या गावातील लोकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत तोबरे अण्णां यांची संचालक पदी निवड व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
इंदापूर तालुक्याचे विकासरत्न तथा लोकप्रिय आमदार दत्तात्रय मामा भरणे हे तोबरे अण्णांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन व वडापुरी सारख्या महत्त्वाच्या गावातून फक्त एकच इच्छुक फॉर्म आल्याने त्यांना उमेदवारी देतील अशीच चर्चा सध्या वडापुरी व पंचक्रोशीमध्ये चालली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here