शरदचंद्रजी पवार यांची निमगांव केतकी येथील मोरे कुटुंबियांना सदिच्छा भेट

उपसंपादक निलकंठ भोंग
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे अनावर करण्यासाठी कुर्डूवाडी ता. माढा येथे मार्गस्थ होत असताना निमगाव केतकी येथील मोरे कुटुंबियांना सदिच्छा भेट दिली. यावेळी समीर मोरे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा त्यांच्याकडून पवार साहेबांचे शाल, श्रीफळ, हार देऊन स्वागत करण्यात आले. तसेच भारत मोरे यांनी पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली.शरदचंद्रजी पवार साहेब व ज.मा. मोरे यांची घनिष्ठ मैत्री सबंध महाराष्ट्राने पाहिली आहे ज.मा.मोरे यांच्या निधनानंतर पवार साहेब यांनी मोरे कुटुंबाचे स्वतः येऊन सांत्वन देखील केले होते. आणि त्यानंतर प्रथमच त्यांनी मोरे कुटुंबियांना भेट दिली. त्यामुळे पवार आणि मोरे कुटुंबीयांचे नाते किती घनिष्ठ आहे यावरून समजते.
यावेळी निमगाव केतकी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here