व्हाट्सअप स्टेटस ठेवून व सोशल मीडियावर पोस्ट वायरल करत बहुसंख्य समर्थकांनी हर्षवर्धन पाटील यांचे केले समर्थन..

इंदापूर: गेल्या काही दिवसांपासून इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये विविध घडामोडी घडत असून या घडामोडींमध्ये प्रामुख्याने भाजपाचे काही वरिष्ठ लोक राष्ट्रवादीत जाण्याच्या मार्गावर असून आज सकाळपासून दीपक जाधव, अमोल इंगळे यांच्याही राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत.यापूर्वी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोलेसर व पंचायत समितीचे सभापती बापूराव शेंडे यांनी राष्ट्रवादीत जाणार असल्याचे आधीच सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे.याच गोष्टीच्या चर्चा तालुकाभर होत असतानाच व्हाट्सअप या सोशल मीडियावर हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांनीही हर्षवर्धन पाटलांचे फोटो ठेवत एक प्रकारे त्यांचे समर्थन केले आहे. वेगवेगळी भाषणे व व्हिडिओ बनवून ‘आम्ही आपल्या सोबत आहोत’ असे प्रकारचे समर्थन केले असल्याचे दिसून येते.”भाऊ आम्ही तुमच्या सोबतच आहोत, सर्वसामान्य लोकांना  तुमचेच नेतृत्व हवे आहे. कितीही नेते गेले तरी सामान्य जनता फक्त तुमच्यासोबतच असणार आहे अशाा पोस्ट वायरल होत आहेत.” इंदापूरच्या इतिहासामध्ये इंदापूर तालुक्यातील मोठे नेते जरी पक्ष सोडून गेले तरी जनतेनी त्यांना स्विकारले नाही मग ते भाजपाचे असो की इतर पक्षाचे असा इतिहास आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात जनता काय ठरवेल आणि तालुक्यात चाललेल्या राष्ट्रवादीतील मेगा भरतीला सामान्य जनता स्वीकारेल का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here