व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सदैव कटिबद्ध – व्यापारी महासंघाचे अध्यक्ष भरतशेठ शहा

👉 प्रतिष्ठित व्यक्तिमत्व भरतशेठ शहा यांची इंदापूर शहर व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड.
👉 उपाध्यक्षपदी युवकांचा नवीन चेहरा व अभ्यासू व्यक्तिमत्व संदीप वाशिंबेकर यांची निवड
👉 इंदापूर शहर व्यापारी महासंघाच्या कार्यकारणीची निवड सर्वानुमते संपन्न.
इंदापूर : इंदापूर शहर व्यापाऱ्यांची बैठक गुरुवारी पार पडली.या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी संदर्भात एक संघ असावा या उद्देशाने इंदापूर शहर व्यापारी महासंघाची निर्मिती करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.व त्यानुसार या व्यापारी महासंघाच्या कार्यकारणीची निवड प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेमध्ये व्यापारी सदस्यांनी लक्षणीय उपस्थिती दर्शवली.
इंदापूर शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणाऱ्या कर्मवीर कारखान्याचे उपाध्यक्ष व शहा ब्रदर्स अँड कंपनीचे भरतशेठ शहा यांची इंदापूर शहर व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे सर्व व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून एक अध्यक्ष म्हणून चांगला पाठीराखा मिळाला याचा सर्व व्यापाऱ्यांना आनंद वाटू लागला आहे.अतिशय शांत व हसतमुख स्वभावाचे असलेले भरतशेठ शहा हे शहरातील एक दानशूर व्यक्तिमत्व असून त्यांच्या नावाला एक मुखाने सर्व व्यापाऱ्यांनी अध्यक्षपदासाठी संमती दिली.यावेळी भरत शेठ म्हणाले की,”येणाऱ्या काळात व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असेल,सर्व प्रकारच्या व्यावसायिकांची मासिक मीटिंग घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेईन व त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. व्यापाऱ्यांनी जो विश्वास ठेवलाय त्यास मी सदैव पात्र राहील”. असे भरतशेठ शहा यांनी आपली मत स्पष्ट केले. या निवडी बरोबरच शहरातील एक प्रतिष्ठित व्यापारी व युवकांचा एक नवीन चेहरा म्हणून ओळखले जाणारे संदीप वाशिंबेकर यांची या महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. संदीप वाशिंबेकर यांचेही सर्व व्यापाऱ्यांशी सलोख्याचे संबंध आहेत.”भविष्यातही व्यापाऱ्यांच्या अडीअडचणींना धावून जाण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” असे संदीप वाशिंबेकर म्हणाले.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सचिव पदी मेघशाम पाटील, खजिनदार पदी दिलीपशेठ कासार,सहसचीव पदी प्रशांत पवार,सहखजिनदार पदी सागर सुर्यवंशी,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी उपस्थिततांनी नवनिर्वाचित व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने व ज्येष्ठांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे अभिनंदन केले.
एकंदरीतच भरतशेठ शहा यांच्या रूपाने व्यापाऱ्यांना एक अनुभवी पाठीराखा मिळाला असून उपाध्यक्षपदी संदीप वाशिंबेकर यांच्यासारखा युवकांमधील नवीन व अभ्यासू चेहरा मिळाला आहे.


अध्यक्ष :- भरत शेठ शहा
उपाध्यक्ष :- संदीप वाशिंबेकर
कार्याध्यक्ष :- नंदू गुजर
सचिव :- मेघश्याम पाटील
सहसचिव :- किशोर पवार सर
खजिनदार :-दिलीपशेठ कासार
सह खजिनदार :-सागर सूर्यवंशी


Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here