व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी ग्राहकांचे समाधान ही गुरुकिल्ली : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील.

इंदापूर (भिगवण):व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी ग्राहकांचे समाधान ही गुरुकिल्ली आहे. व्यवसायामध्ये सचोटी व जिद्दीच्या जोरावर निश्‍चितपणे प्रगती होते, त्यामुळे युवकांनी विविध व्यवसायात आत्मविश्वासाने उतरून यशस्वी व्हावे ,असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवार (दि.18 ) केले.
भिगवण येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज भिगवण-राशीन रोडवर तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या शेजारी अभिनव वाघ व सूरज वाघ यांनी सुरू केलेल्या ‘ चायनीज हट ॲंड बिर्याणी हाऊस चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी नवीन हॉटेलसाठी वाघ परिवाला शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक पराग जाधव व विश्वास देवकाते, इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, तक्रारवाडीचे सरपंच सतिश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.


 
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here