वृद्धाश्रमात जाऊन साजरा केला आनंद केकान वकील यांनी वाढदिवस

इंदापुर येथील आनंद केकान वकिल यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला अनावश्यक खर्च टाळून समर्पण वृद्धाश्रमात जाऊन एक दिवस वृद्धांची सेवा करून आपला वाढदिवस साजरा केला.वृद्धाश्रमातील लोकांना वाढदिवसानिमित्त किराणा, मसाले या स्वरूपात अन्नदान केले. समर्पण वृद्धाश्रम लोणी काळभोर येथील आश्रमात 35 वयोवृद्ध लोक आहेत या लोकांसमवेत गप्पा गोष्टी सर्वांना भेट घेऊन विचारपूस करून त्यांची सेवा करून त्यांच्याबरोबर केक कापून आनंद केकान वकिलांनी आनंद व्यक्त केला.मागील काही दिवसापूर्वी आनंद केकान वकील  कामानिमित्त बाहेर गावी जात असताना एका मुक्या प्राण्यांचा जीव वाचवला या गोष्टीमुळे ही वकीलसाहेब चर्चेत होते. प्रत्येक व्यक्तींना काही ना काही मदत करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे आहे. आज  त्यांनी अनावश्यक खर्च टाळून आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा केला हा एक आदर्श सर्वांपुढे ठेवला. यावेळी या कार्यक्रमास सचिन घनवट,अॅङ लक्ष्मण घुले, प्रमोद मासाळ, सुहास आबा खुटवड कामठे पुणेकर सर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here