भिगवण प्रतिनिधी: रोहित बागडे
वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत असून,पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे असे प्रतिपादन रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे यांनी केले.रोटरी क्लब भिगवण यांच्या वतीने सिद्धार्थ ग्रुप परिसरामध्ये दि.18 रोजी वृक्षारोपण करण्यात आले.निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे,असे आवाहन रोटरी क्लब कडून करण्यात आले.
या वृक्षारोपनाच्या कार्यक्रमा प्रसंगी सेक्रेटरी सुषमा वाघ, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, माजी अध्यक्ष संपत बंडगर,रियाज शेख, महेश शेंडगे, प्रदीप वाकसे,किरण रायसोनी,प्रवीण वाघ, बाळासाहेब ननवरे,संदीप धवडे,सुमन शेलार, सनी शेलार व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सिद्धार्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर जाधव, अध्यक्ष राजेंद्र जाधव, खजिनदार विकी मोरे, उपाध्यक्ष प्रताप भोसले, कोमल जाधव, राणीताई धवडे उपस्थित होते यावेळी सिद्धार्थ ग्रुपच्या वतीने या वृक्षांचे संगोपन चांगल्या प्रकारे केले जाईल असे अध्यक्ष सागर जाधव व राजेंद्र जाधव यांच्या ग्रुपच्या वतीने आव्हान करण्यात आले.