पन्हाळगडचा वाघ विररत्न शिवबा काशिदबलिदान दिनानिमित्त आज सकाळी ११ वाजता DR मारकड संकुल येथे विररत्न शिवबा काशिद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी बोलताना नाभिक समाजाचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर यांनी शिवाजीराजे म्हणून मरण्याचे भाग्य मिळाले़. म्हणून हसत हसत मरणाच्या दारी जाणारे वीर शिवबा काशीद यांचे आज पुण्यस्मरण. नरवीर शिवबा काशीद यांची जन्म भूमी पन्हाळा ही असून शिवबा काशीद हे शिवाजी महाराजांचे लष्करातील जिवाला जिव देणारे बारा बलुतेदारांपैकी नाभिक समाजातील सैनिक त्यांनी शिवाजीराजें वर आणि पर्यायाने स्वराज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळ गडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप विशाल गडावर पोहचले. शिवबा काशीद हुबेहुब छत्रपती शिवाजी महाराज सारखे दिसत होते.त्यांना पोशाख ही शिवाजी महाराजांचाच दिला होता. त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवबा काशीदला शिवाजीराजे समजून पकडले ही घटना १३ जुलै १६६० या दिवशी घडली. शिवाजीराजांनी पन्हाळा सोडण्याचे ठरविले आणि बरोबर ६०० हत्यारबंद पायदळ, बाजीप्रभूंसह महाराज हेरांनी योजलेल्या मार्गाने पन्हाळयावरून निसटले. १२ जुलै १६६०, आषाढ पौर्णिमा, गुरूवार, रात्रीचे सुमारे १० ची वेळ विजा चमकत होत्या़. पाऊस कोसळत होता. आणि एवढ्यात सिद्दीच्या एका पहारेकऱ्याने हे पाहिले आणि तो ओरडला. `दगा दगा!’ ही चाहूल लागताच राजांनी दोन पालख्या केल्या. एका पालखीत ते स्वत: तर दुसऱ्या पालखीत शिवरायांसारखा दिसणारा, त्यांच्यासारखाच पेहराव केलेला प्रति शिवाजी शिवबा काशीद बसले. महाराज एका आडमार्गाने विशालगडावर जाण्यासाठी रवाना झाले. हेरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्दी जौहरकडे पोहोचविली. जौहरने मसूदला पाठलाग करावयास सांगितले आणि अखेर शिवरायांना पकडले. पण ते खरे शिवाजी नाहीत हे कळताच शिवाजी म्हणून पकडून आणलेल्या शिवबा काशीदयांचा शिरच्छेद करण्यात आला. स्वातंत्र्यासाठी स्वराज्यासाठी शिवराजासाठी शिवबा काशीदने समर्पण केले.”
वीररत्न शिवबा काशिद यांच्या बलिदान दिनानिमित्त कार्यक्रमावेळी ह.भ.प.नरेंद्र ( बंडु ) साळुंखे,रामभाऊ राऊत,वैजिनाथ राऊत,पोपट गाडेकर,बंडु चौधरी,संतोष नाना गाडेकर,विनोद गायकवाड,राजु गोरे,संतोष क्षिरसागर,कुमार मराळ यांचे सह समाज बांधव ऊपस्थीत होते.