वैभव पाटील :प्रतिनिधी
पालघर- सफाळे (प) नजीक असलेल्या विराथन बुद्रुक येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रविवार १४ ऑगस्ट रोजी संत निरंकारी मंडळांच्या अनुयायींनी अभिनव विद्यालय, विराथन बुद्रुक विद्यालयाच्या आजूबाजूचा परिसर व स्मशान भूमी परिसर स्वच्छ करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
अभिनव विद्यालय, विराथन बुद्रुक शाळेत महेंद्र गवळी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर शालेय विद्यार्थी व शिक्षक स्वच्छता अभियानामध्ये उस्फूर्तपणे सहभागी झाले. त्यावेळी नगावे ब्रँचचे प्रमुख महेंद्र गवळी, संचालक विवेक गोरे, गोपीचंद पाटील, ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर किणी, महेंद्र पाटील,अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नेहा किणी मॅडम,शाळेतील सर्वशिक्षक वृंद उपस्थित होते. त्याचबरोबर परिसरातील संत निरंकारी भक्त गण उपस्थित होते.
प्रतिवर्षी संत निरंकारी मंडळाचे अनुयायी शाळा, महाविद्यालये, मंदिर परिसर, स्मशानभूमी परिसर ,आरोग्य केंद्र, रेल्वे प्लॅटफॉर्म परिसर अशा विविध सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्या त्या परिसराची संपूर्ण स्वच्छता करीत असतात. गुरु आदेशाला प्राधान्य देऊन ऑगस्ट महिन्यात अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर रॅलीचे आयोजन करून रक्तदानाविषयी जनजागृती केली जाते. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदानाचे महान कार्य संत निरंकारी मंडळ करीत आहे.