विना अनुदान तत्वावर अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे अध्यापन करून सुद्धा कायम न झालेल्या शिक्षकांचे मुंबईतील आझाद मैदानावर 10 ऑक्टोंबर पासून महाएल्गार आंदोलन होणार. राष्ट्रनिर्माता असणारा शिक्षक आज विनाअनुदान तत्त्वावर अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे अध्यापन करूनसुद्धा तो आज कायम झालेला नाही. अनेक वर्ष सेवा करून कायम नसल्यामुळे शिक्षकावरती आज उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर दारिद्र्य, दुःख,अपमान व अवहेलना होत आहे. विनाअनुदानित शिक्षक समन्वय संघाच्या वतीने इंदापूर या ठिकाणी शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी इंदापूर, अकलूज ,माळशिरस, माढा या परिसरातील विनाअनुदानित शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. यामध्ये प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील अघोषित ,घोषित, त्रुटीपात्र अनुदानित होण्यासाठी धडपडणारे शिक्षक एकत्र आले होते. या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता मुंबईहून शिक्षक समन्वय संघाच्या प्रमुख नेहाताई गवळी उपस्थित राहिल्या होत्या. त्याचबरोबर सोलापूरहून या मेळाव्यासाठी खड्डे मॅडम, प्रा.बिराजदार सर,घाडगे सर व गावडे मॅडम व्यासपीठावर उपस्थित होत्या.राष्ट्राची जडणघडण करणारा शिक्षक उपाशी पोटी अध्यापन करतो. शिक्षकी पेशामध्ये वयाची 15 ते 20 वर्ष विनावेतन काम करूनही पोट भरत नसेल याकडे उदासीन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काम करून सुद्धा रोजी रोटीच्या प्रश्ना संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होणे ही एक जटिल समस्या निर्माण झालेली आहे. हा प्रश्न न सुटल्यामुळे उदासीन झालेल्या शिक्षकांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .दररोज जबाबदारीने प्रामाणिकपणे राष्ट्र घडवणारा हा शिक्षक विनावेतन काम का करतो ही वेळ कोणामुळे आली का आली आणि कशासाठी आणली गेली यांसारख्या अनेक प्रश्नांचा मागोवा या मेळाव्यात घेण्यात आला. यावेळी समन्वयक नेहाताई गवळी म्हणाल्या की, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला विनाअनुदानित सारखी लागलेली कीड कायमची घालवायची असेल तर एकत्र या येणं ही काळाची गरज बनली आहे .असे प्रतिपादन त्यांनी केले .त्याकरिता मुंबईतील आझाद मैदानावर 10 ऑक्टोबर पासून महाएल्गार आंदोलन होणार आहे. माझा पगार माझी जबाबदारी उक्तीप्रमाणे आळस मरगळ झटकून सकारात्मक व्हा.एकत्र या. विचार करा! आपण त्या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे आहे. आपण स्वतःच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत .त्याकरिता आपण बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी विनाअनुदानित तुकड्यांवरती काम करणाऱ्या शिक्षकांनी शिक्षकीपेशात येऊन आपली फरफट कशी होत आहे.पराकोटीचा संघर्ष ,वेदनादायक दुःख,अशा व्यथा मांडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बागल सर यांनी केले.सूत्रसंचालन सोनवलकर सर यांनी केले.आभार शेंडगे सर यांनी मानले.
Home Uncategorized विना अनुदानीत शिक्षकांचे मुंबईतील आझाद मैदानावर 10 ऑक्टोंबर पासून महाएल्गार आंदोलन..