इंदापूर येथे ॲम्बिशिअस क्लासेस च्या वर्धापनदिन आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी चांदीची फ्रेम चा लकी ड्रॉ काढण्यात आला.या प्रसंगी रत्नप्रभा देवी पाटील महाविद्यालय चे पाचार्य डॉ लहु वावरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना बोलताना सांगितले की,”आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन स्किल आत्मसात केले तरच आपल्याला संधी प्राप्त होते. ज्यांना यश मिळवायचे असते आणि मिळवलेले यश टिकवायचे असते त्यांनी कायम ॲम्बिशिअस असावे”.याप्रसंगी निलम शेवाळे, पायल राऊत, रसिका ठवरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच प्रा. प्रशांत बंगाळे आणि प्रा मोनाली बंगाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी विविध परिक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आणि त्यांचा सत्कार करण्यात आला.छोटा रुद्र बंगाळे यानेही गुरू प्रती आपले विचार मांडले.प्रास्ताविक प्रशांत बंगाळे यांनी केले, आणि आभार प्रिया राऊत हिने मानले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोर्णिमा शेवाळे हिने केले.