इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा,आणि १००% निकाल लागलेल्या शाळांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पोलीस उपअधिक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार
इंदापूर: शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठाण, वनगळी, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, इंदापूर व श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी, बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 11 जून रोजी येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा,आणि १००% निकाल लागलेल्या शाळांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पोलीस उपअधिक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे ओळखून शैक्षणिक प्रवेशाचे निर्णय घ्यावेत असे मत व्यक्त केले.हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ 10वी व 12 वी नंतर पुढे कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा याचा निर्णय विद्यार्थ्यांनी आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे ओळखून शैक्षणिक प्रवेशाचे निर्णय घ्यावेत. शिक्षण हे संस्कार घडविण्यासाठी, व्यक्तीचे आयुष्य परिपूर्ण करण्याकरिता तसेच समाजामध्ये योग्य स्थान निर्माण करण्याकरिता महत्त्वपूर्ण ठरते. परिस्थिती बदलविण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. जिद्द ,चिकाटीने आपण ध्येयपूर्ती करावी.कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या दूरदृष्टीकोनामुळे इंदापूर तालुक्यामध्ये शैक्षणिक दालन निर्माण झाले.आपल्या काळात नवीन 96 हायस्कूल स्थापन झाले.30 ते 35 हजार विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचे कार्य या सर्व संस्थेच्या माध्यमातून होत आहे मात्र दुर्दैवाने गेल्या आठ वर्षात एकही नवीन तुकडी मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे.पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे म्हणाले की,’ विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याचे दोन भाग केले पाहिजे. एक भाग 5 वर्ष आणि पुढचे 50 वर्ष जर पहिल्या 5 वर्षात जिद्द ,चिकाटी मेहनतीने आपण आपले शैक्षणिक कर्तव्य योग्य रीतीने पार पाडले तर पुढील 50 वर्षे आपल्याला चांगले जीवन जगता येईल. डॉ.अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेत विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवावे , सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा, नवनवीन पुस्तके वाचावीत, व्याख्याने ऐकावीत तसेच प्रामाणिक व जिद्द चिकाटीने प्रयत्न केल्यास यातून विद्यार्थ्यांचे करिअर घडेल. शिक्षक वर्ग नेहमी उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या पाठीशी असतात.इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड. मनोहर चौधरी ,श्री. नारायणदास रामदास इंग्रजी मीडियमच्या मुख्याध्यापिका फौजिया शेख विद्यार्थिनी स्नेहल सुनील शेंडे,कल्याणी तुकाराम माने यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.श्री. नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास फलफले यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर ,नितीन भोसले आणि अमर निलाखे यांनी केले.आभार श्री. शिवाजी विद्यालय बावडाचे मुख्याध्यापक डी. आर. घोगरे यांनी मानले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी ,पालक ,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थी व पालकामध्ये आनंदाचे वातावरण होते. फोटो आणि सेल्फी काढून आपला आनंद ते द्विगुणित करीत होते.
Home Uncategorized विद्यार्थ्यांनी आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे ओळखून शैक्षणिक प्रवेशाचे निर्णय घ्यावेत...