विद्यापीठाच्या परीक्षेचा घोळ कायम,ऑफलाइन की ऑनलाइन?; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा १५ फेब्रुवारीपासून ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेऊन परीक्षा व मूल्यमापन मंडळ तयारी करीत आहे. तर, आज सोमवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेत किमान अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन घेणे गरजेचे आहे, असा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा कशा होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांसह संघटनांनी केली आहे.उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे विद्यापीठाकडून २१ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले. परीक्षेसाठी साधारण साडेसहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून ऑनलाइन घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु, व्यवस्थापन परिषदेच्या काही सदस्यांनी किमान अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन घ्यावी, असा प्रस्ताव देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार व्यवस्थापन परिषदेच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत तसा प्रस्ताव सादर करण्यात येईल. संबंधित प्रस्ताव विद्या परिषदेकडे जाईल, त्यानंतर विद्या परिषदेची बैठक होऊ न निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन होणार की ऑनलाइन, याकडे आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here