विज प्रश्नावरून शेतकरी वर्गात प्रचंड संतापाची लाट ; २८ फ्रेबुवारीला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार – माजी आमदार नारायण पाटील यांचा इशारा

करमाळा(प्रतिनिधी-सविता आंधळकर):करमाळा तालुक्यातील उजनी येथील बॅकवॉटर भागातील वीज पुरवठा महावितरणकडून खंडीत केला गेला आहे . त्यामुळे शेतकऱ्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे . याकडे प्रशासनाचे लक्ष वेधूण्यासाठी आणि विज कनेक्शन लवकरात लवकर जोडावे यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी तहसीलदार यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे .याविषयी अधिक माहिती अशी की, दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका सुरू केला आहे आणि थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे त्यामुळे शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाने त्रस्त आहेत , या अंतर्गत वीज वितरणने करमाळा वीज पुरवठा बंद करून शेतकर्‍यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आहे . करमाळा तालुक्यातील ऊस , केळी , द्राक्ष या नगदी पिकासह भाजीपाला व इतर पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान यामुळे झाले आहे.शेतातील उभ्या पिकांचे पैसे , ऊस व केळी बिलाची रक्कम हाती आल्यानंतर अवश्य स्वतःहुन वीज बिल भरतो पण आता वीजजोड तोडू नका अशी विनंती शेतकरी महावितरणला करत असताना सुद्धा महावितरणकडून कोणत्याही प्रकारची विनंती मान्य केली जात नसल्याने वीज पुरवठा ताबडतोब सुरळीत करून देण्यात यावा, अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा हा महत्वाचा प्रश्न सुटावा म्हणून “हा जुलमी अन्याय न थांबल्यास सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालया समोर लोकशाही मार्गाने शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहोत” ,असा इशारा करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.तसेच या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , ऊर्जामंत्री नितीन राऊत , उर्जाराज्यमंत्री ना . तनपुरे , जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस प्रमुख , अधिक्षक अभियंता महावितरण , उपविभागीय अभियंता महावितरण , कार्यकारी अभियंता महावितरण , उप अभियंता करमाळा , पोलिस निरीक्षक करमाळा आदिंना पाठवले असुन शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here