विजय भालचंद्र मोरे यांची काटी वडापुरी जिल्हा परिषद गट ,शिवसेना विभाग प्रमुख पदी निवड.

इंदापूर: अवसरी या गावातील विजय भालचंद्र मोरे यांची त्यांच्या कामाची दखल घेत, शिवसेनेशी एकनिष्ठ पाहून काटी वडापुरी जिल्हा परिषद गट विभाग प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजय मोरे हे पहिल्यापासूनच एक तत्वी व एकनिष्ठ राहून शिवसेनेबरोबर काम करत आहेत. पक्ष मजबूत करण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे .गोरगरिबांची कामे ते मोठ्या पुढाकाराने ते करतात. जात पात धर्म पक्ष न बघता ते सगळ्यांना मदत करतात. अवसरी आणि जवळच्या परिसरात ही त्यांनी शिवसेना संघटना पूर्ण ताकतीने बळकट बनवले आहे. त्यांचा सर्व लोकांबरोबरच दांडगा संपर्क असल्यामुळे व त्यांच्या कामाची दखल घेऊन, दिनांक 10/12/2021 या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री महेश पासलकर, यांच्या उपस्थितीत त्यांना काटी वडापुरी जिल्हा परिषद गट विभाग प्रमुख पदी नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी इंदापूर विधानसभा संपर्कप्रमुख दयानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे उपजिल्हाप्रमुख संजय काळे तालुकाप्रमुख नितीन शिंदे तालुका संघटक सुदर्शन रणवरे तालुका समन्वयक अरुण पवार उपतालुकाप्रमुख धोंडीराम सोनटक्के शिव साखर तालुका संघटक सुरज काळे हे उपस्थित होते
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here