विजबिलासाठी कनेक्शन तोडले जाणार नाहीत असा जरी शब्द दिला असता तरी शेतकरी मेळाव्याचे सार्थक झाले असते- शेतकऱ्याची पोस्ट वायरल.

इंदापूर शेतकरी मेळावा…एक भ्रमनीरास…
इंदापूर: गेल्या तीन-चार महिन्यांपासून इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापलेली असून या तापलेल्या वातावरणाचा राष्ट्रवादी काँग्रेसला मेगा भरती करण्यात फायदा जरी झाला असला तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनातील काही गोष्टी अपूर्णच राहिले असल्याचे दिसून आले कारण आज मेगा भरतीचा कार्यक्रम संपल्यानंतर एका सामान्य शेतकऱ्यांनी व्हाट्सअप वर एक पोस्ट व्हायरल केली आहे या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की -“आज लाखेवाडीला झालेला शेतकरी मेळावा हा फक्त नावापुरताच शेतकऱ्यांसाठी होता.इंदापूर तालुक्यात गेल्या 2 वर्षात शेतकरी कुठल्या परिस्थिती मधून जात आहे याची कल्पना ‘जाणते राजे’आणि त्यांच्या कन्या खासदार सुळे यांना नसावी हे नवलच आहे.”
“आजच्या घडीला इंदापूर मधील शेतकऱ्यांना दिली जाणारी विज ही 2 वर्षात म्हणजे आपले महाविकास आघाडी सरकार आल्यापासून कमीत कमी 10 वेळा तोडली आहे. आणि ते पण पीके ऐन जोमात असताना आणि हे फक्त इंदापूर तालुक्यातील चित्र आहे.बाकी शेजारील तालुक्यात असा विज तोडणीचा प्रकार नाही.कोट्यावढीच्या गप्पा मारणारे स्वतः इंदापूरचे आमदार राज्यमंत्री असताना त्यांच्या मताला सरकार कवडीची किंमत देत नाही यावरून समजते.हे सर्व होताना शेतकऱ्यांसाठी हर्षवर्धन पाटील यांनी 2 मोठी आंदोलणे केली त्याला राज्य सरकारने प्रतिसाद दिला आणि काही काळापुरता विज तोडणी पासून दिला.”
“आज सर्व हे होत असताना विधानसभेला प्राचारत इंदापूर मध्ये शेतकऱ्याचे जाणते राजे पवार साहेब यांनी शेतकऱ्याला शब्द दिलेला, की सरकार बदला, परिवर्तन करा, संपूर्ण कर्ज माफी करू.आज शेतकरी दुहेरी संकटात असताना राज्य सरकारचे प्रमुख नियंत्रक म्हणून आपल्याकडून आज शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्याला अपेक्षा होती की,विधानसभेला दिलेला शेतकरी संपूर्ण कर्ज माफीचा शब्द आपण पाळचाल. पण आपण केवळ शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग केला.”
“एवढेच नाही देशाचे जाणते राजे तुमी आम्हाला शेतकऱ्याला नुसता येणाऱ्या काळात शेतकऱ्याची विज कनेकशन्स बिलासाठी तोडली जाणार नाहीत असा जरी शब्द दिला असता तरी शेतकरी मेळाव्याचे सार्थक झाले असते.
पण दुर्दैव आपण तालुक्यात येऊन येथील शेतकऱ्याला शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली येऊन काय देऊन गेला हा माझा भाबडा प्रश्न स्वतःला जाणतेराजे म्हणून घेणाऱ्या पवारसाहेब आणि खासदार सुळे यांना आहे.”
अशा प्रकारे पोस्ट वायरल होऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना या पोस्टद्वारे 2 मिनिटे का होईना पण विचार करायला लावणारी पोस्ट ठरली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here