विकृत बुद्धीच्या मनोहर भिडे(कुलकर्णी) यास तात्काळ अटक करा- सावता परिषदेची मागणी.

सावता परिषदेचे इंदापूर तहसीलदार यांना निवेदन.
इंदापूर प्रतिनिधी: विकृत बुद्धीचे मनोहर भिडे (कुलकर्णी) यांनी अनेक वेळा क्रांतीसुर्य महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी देशाचे मा.पंतप्रधान पंडित नेहरू, राजाराम मोहन राॅय यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बहुजन समाजातील बांधवांच्या भावना दुखावल्या असून मनोहर भिडे (कुलकर्णी) यांच्या बद्दल समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. या वक्तव्याचा सावता परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करत
मनोहर भिडे (कुलकर्णी) ला तात्काळ अटक करा. व त्यांचे इथून पुढे होणाऱ्या सर्व कार्यक्रमा वरती बंदी घालून कायदेशीर मार्गाने कठोरात कठोर कारवाई करावी. अन्यथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन अधिक तीव्र करून रास्ता रोको व निरनिराळ्या मार्गाने महाराष्ट्रभर आंदोलन उभा केले जाईल. अशा आशयाच्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात आल्या आहेत.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे म्हणाले की, राष्ट्रपिता बहुजन नायक शिक्षण महर्षी महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे मा. पंतप्रधान पंडित नेहरू, राजाराम मोहन राॅय यांच्या बद्दल मनोविकृत मनोहर भिडे (कुलकर्णी) यांनी बेताल वक्तव्य केलेली आहेत. या बेताल वक्तव्याचा मी जाहीरपणे निषेध करतो. व त्याच्यावर कटोऱ्यात कठोर कारवाई करावी अशी मागणी करतो.
यावेळी बोलताना सावता परिषदेचे मुख्य संघटक संतोष राजगुरू म्हणाले की, मनोविकृत मनोहर भिडे महापुरुषाबद्दल सातत्याने चुकीचा इतिहास सांगतो.सतत महापुरुषांची बदनामी करतो. याच्या पाठीमागे नक्की कोण आहे. याचा खुलासा सरकारने करावा. यापूर्वी त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याला गृहमंत्र्यांनी क्लीन चिट देऊन त्याच्यावरील सर्व गुन्हे काढून टाकले आहेत.
यावेळी सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रकाश नेवसे,
इंदापूर तालुका महिला आघाडी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा छायाताई पडळकर,इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक पोपट शिंदे, विजय हेगडे, संदीप भोंग,ॲड. नितीन राजगुरू,ॲड रेश्मा गार्डे, बापू बोराटे, बाळासाहेब व्यवहारे, राहुल ननवरे, सचिन शिंदे, अजय गवळी, विजय महाजन,महादेव शेंडे, धनंजय राऊत, हर्षल व्यवहारे, रामदास बनसोडे, दादा गार्डे, दादासाहेब भिसे सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here