राज्यात वाळू माफियांचा हैदोस सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.आता सरकारी अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून ही बातमी समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील तळोदा तालुक्यात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होते.याची माहिती मिळताच घटास्थळी स्थानिक मंडळ अधिकारी आणि तलाठी दाखल झाले. कारवाईसाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना पाहून वाळू माफिया चांगलेच संतापले आणि त्यांनी मडंळ अधिकारी, तलाठीच्या अंगावर टॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.
तळोदा तालुक्यातील नळगव्हाण गावाजवळील वाल्हेरी नदी पात्रातून वाळू माफिया वाळुची तस्करी करत होते. यावेळी मंडळ अधिकारी आणि तलाठी त्यांच्यावर कारवाईसाठी गेले होते.आरोपींनी ट्रॅक्टरमधील वाळुची ट्रॉली उचकवून घटनास्थळावरुन पळ काढला आहे.महसूल अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे.आरोपी गुजरात राज्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Home ताज्या-घडामोडी वाळू माफियांचा हैदोस- कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यांवर ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न.