कॅन्सर हा दुर्धर आजार असून या आजाराशी दोन हात करीत असताना कॅन्सरग्रस्त कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती खालावत जाते.समाजातील लोकांनी अशा कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात देऊन सामाजिक हित जपणं ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन “नो शेव्ह नोव्हेंबर कॅम्पेन फॉर कॅन्सर पेशंट्स” या आंतरराष्ट्रीय मोहीमेचे आयेजक आणि वारणा कॅन्सर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजीत जाधव यांनी केले.
वारणा कॅन्सर फौंडेशनच्यावतीने याच सामाजिक भावनेतून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या आर्थिक दुर्बल अशा कॅन्सरग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामधे “नो शेव्ह नोव्हेंबर कॅम्पेन फॉर कॅन्सर पेशंट्स” ही आंतरराष्ट्रीय मोहीम राबविल्याची माहिती डॉ.जाधव यांनी दिली.देशसेवा ही प्रत्यक्ष सीमेवर जाऊनच केली जाते असं नसून वारणा कॅन्सर फौंडेशन समाजासाठी जे विधायक कार्य करत आहे ती पण एक देशसेवाच असल्याचं मत कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि निवृत्त आर्मी नायक श्री.प्रकाश मारुती शिंदे यांनी व्यक्त केले.
“नो शेव्ह नोव्हेंबर” सारखी आंतरराष्ट्रीय मोहीम कोल्हापूर जिल्ह्यामधे राबवून डॉ.अभिजीत जाधव यांनी कॅन्सरग्रस्तांसाठी मोठा आर्थिक आधार दिल्याचे मत प्राध्यापक श्री.संदीप जाधव सर यांनी व्यक्त केले.युवकांनी नो शेव्ह नोव्हेंबर सारख्या उपक्रमांमधे सहभागी होऊन समाजातील कॅन्सरग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक हातभार लावण्याचे मत श्री.वसंत चव्हाण यांनी व्यक्त केले. या मोहिमेस समाजातील 210 दानशूर नागरिकांनी प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे या मोहिमेस मदत केली होती.यामधून कोल्हापूर जिल्ह्यामधील चार कॅन्सरग्रस्तांना एकवीस हजार रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली.मोहिमेचे हे 14 वे वर्ष असून आत्तापर्यंत 88 कॅन्सरग्रस्तांना पाच लाखांची आर्थिक मदत करण्यात आलेची माहिती डॉ.जाधव यांनी दिली.बहिरेवाडी येथील श्री.महात्मा गांधी वाचनालयाच्या सभागृहामधे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामधे संघटक राम करे,परशुराम कावळे,सयाजी गुरव,प्रमोद कावळे,संदीप जाधव,लोकमतचे आनंदा वायदंडे,एस न्यूज चे नितीन पाटील,बी न्यूज चे राजकुमार जाधव,नथुराम तेली,शिवराज जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार राम करे यांनी मानले.सूत्रसंचालन लखन करे यांनी केले.