वादळ, गारपीट आणि वीज कोसळून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे होऊन मदत मिळावी -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर येथील मोरे वस्तीवर नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झालेल्या नुकसानीची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली पाहणी. काल रात्री इंदापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला होता तसेच मोठ्या कडकडासह आवाज होवून वीज झाडावर पडली होती. इंदापूर नजीक मोरे मळा येथे बाळासाहेब मोरे यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडावर मोठ्या आवाजासह वीज पडून नारळाच्या झाडाने पेट घेतला होता.वीज पडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज मोरे मळा वस्तीवर येऊन परिसराची पाहणी केली तसेच उपस्थितांशी संवाद साधला यावेळी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की इंदापूर तालुक्यामध्ये काल अचानकपणे वादळ ,गारपीट तसेच वीज कोसळून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाईची मदत मिळावी.हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,’ इंदापूर तालुक्यात अचानकपणे काल सर्व भागात चक्रीवादळ व गारासह पाऊस झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, जनावरांचे नुकसान झाले आहे. फळबाग व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारला मागणी केली आहे की ताबडतोब पंचनामे करा व झालेल्या नुकसानीची मदत मिळावी. सणसर भागात कालवा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे त्याचीही पंचनामे करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांशी संपर्क केला असुन त्यांनी ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळेल.’

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here