संघर्षयोद्धा श्री. हर्षवर्धनजी पाटील कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊ या महान वटवृक्षाच्या विचारांच्या छायेखाली ज्यांची जडणघडण झाली असे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील ‘कोहिनूर’ हिरा असा ज्यांचा उल्लेख करता येईल असे इंदापूर तालुक्याचे राजवैभव मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब उर्फ भाऊ!
“शृंगार होता संस्कारांचा
अंगार होता स्वराज्याचा
शत्रूही नतमस्तक होई जिथे
असा पुत्र होता माझ्या शिवबाचा”
या उक्तीस सार्थ ठरावे असे राजवैभव इंदापूर तालुक्यातील बावडा गावी २१ ऑगस्ट १९६३ दिवशी आई रत्नप्रभादेवी यांच्या उदरी रत्न जन्माला आले.वडील शहाजीराव पाटील व आई रत्नप्रभादेवी पाटील यांनी नाव ठेवले हर्षवर्धन
भाऊंचे प्राथमिक शिक्षण बावडा या ठिकाणी झाले.उच्च शिक्षण इंदापूरच्या कॉलेजला, नंतर पुढील शिक्षण पुण्यात झाले. पुढे भाऊंनी एलएलबी वकिली व्यवसाय शिक्षण पूर्ण केले.काळ ,वेळ ,परिस्थिती कशी बदलेल हे सांगता येत नाही.”नियतीचा कुणीही मालक नाही”. वयाच्या सोळाव्या वर्षी भाऊंचे वडील शहाजीराव पाटील भाऊंना सोडून गेले. भाऊंचे पितृछत्र हरपले आणि खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली.काळ बदलतो, वेळ बदलते, परिस्थितीही बदलते; पण संघर्ष हा करावाच लागतो. तरच मार्ग सापडतो.तळहाताने चंद्र झाकता येत नाही तो वरती यायचा तो येतच असतो. त्याप्रमाणे इंदापूर तालुक्यात विधानसभेचे वारे वाहू लागले. १९९५ साली भाऊ इंदापूर तालुक्याचे आमदार झाले.इंदापूरच्या राजकीय इतिहासात १९९५, १९९९,२००४ आणि २००९ असे सलग चार वेळा भाऊ इंदापूर तालुक्याचे आमदार झाले. एक सलग १९ वर्ष सत्ता आणि भाऊ व भाऊ बरोबर सत्ता असे सूत्र होते. या काळात भाऊंना कृषी जलसंधारण व फलोत्पादन राज्यमंत्री, महिला व बालविकास ,पणन व रोजगार हमी योजना, सहकार, संसदीय कार्य खात्यांचा पदभार देण्यात आला. या खात्यांचे मंत्री झाल्यानंतर भाऊंनी नुसत्या कामाचा सपाटा लावला. आपल्या कार्यकर्तुत्वातून दिमाखदार कामगिरी पार पाडली.त्याचबरोबर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर इंदापूरचे हर्षवर्धन पाटील अशी ओळख निर्माण झाली. देशाच्या कानाकोपऱ्यात इंदापूरचे नाव झाले. आदरणीय भाऊंनी सलग दहा वर्षे संसदीय कामकाज मंत्री म्हणून उत्तम पद्धतीने काम केल्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती सौ.प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते भाऊंना उत्कृष्ट संसदपट्टू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.भाऊ फक्त राजकारणीच आहेत असे नाही .उत्तम लेखकही आहेत. त्यांचे विधानगाथा हे पुस्तक प्रकाशित झाले. “विधान गाथा पुस्तक म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचे हँडबुक आहे.” अशी बोलकी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आहे.
” कोठे जिंकायचं आहे
व कुठल्या क्षणी हरायचं आहे.
हे ज्यांना समजते.
त्यांना हरवणे सर्वात जास्त अवघड असते”.
हर्षवर्धनजी पाटील एक स्वतंत्र विचारधारा आहे.एक वेळ तर अशी आली भाऊंना एक विचारधारा सोडून दुसरी विचारधारा स्वीकारावी लागली .अशा काळात जनता सांगेल तीच माझी विचारधारा असेल ती मी स्वीकारणार असा पण केला. भाऊंनी कमळ हाती घेतलं. उत्तम नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व असा त्रिवेणी संगम असणाऱ्या भाऊंनी भाजप पक्षात प्रवेश केला.
“आदमी न कद से बडा होता है। ना पद से बडा होता है।
जो आदमी दुसरे के मुसिबतो में खडा होता है ।
वह सबसे बडा होता है।”
एक अभ्यासू, व्यासंगी व्यक्तिमत्व ,चिकित्सक वृत्ती, कुशल संघटक, कर्तव्यदक्ष नेता, समयसूचकता,भाषेवरील प्रभुत्व, दिलदार माणूस, जिगरबाज राजकारणी अशा अनेकविध विशेषणांनी नटलेलं व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते हर्षवर्धनजी पाटील साहेब.भाऊएवढा दांडगा अनुभव इतर राजकीय नेत्यांकडे असेल की नाही. हे मला माहीत नाही ; परंतू अनेक राजकीय व्यक्तींना राजकीय धडे शिकवणारे धडाकेबाज व्यक्तिमत्त्व आमच्या इंदापूरच्या मातीतील आहे. याचा आम्हां इंदापूरकरांना सार्थ अभिमान आहे. हे आमच्या इंदापूरच्या मातीचे मोठेपण म्हणावे लागेल! विधिमंडळाचे कामकाज असो ,राजकीय दौरा असो, एखाद्या प्रसंगातील मतप्रदर्शन असो हे पाहण्यासारखे असायचे.लोकं टीव्ही लावून मन लावून ऐकत बसायची.
भाऊंनी मंत्रिमंडळात काम करत असताना अनेक दिग्गज मुख्यमंत्र्यांसोबत काम केले. याच काळात भाऊंना मा.विलासराव देशमुख व मा. गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय क्षेत्रातील बहुमोल मार्गदर्शन मिळाले .तसेच कर्मयोगी शंकरावजी पाटील उर्फ भाऊंचे मार्गदर्शन सुरूच होते. यामुळे हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचे व्यक्तिमत्व अधिकाधिक खुलत गेले. विधीमंडळामध्ये काम करत असताना विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, विरोधी पक्षनेते, विविध खात्यांचे मंत्री, आमदार या सर्वांच्या सहवासातून, सहकार्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाला.त्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या भाऊंनी पार पाडल्या.त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकमनावर पडलेली छाप ही अजून ना हटली, ना घटली! असं चित्र महाराष्ट्रात आजही पाहायला मिळतं.जनतेचे प्रश्न पोट तिडकिने मांडण्याचे कौशल्य भाऊंना अवगत आहे. विधिमंडळाच्या कामकाजाचा गाढा अभ्यास ही भाऊंची ओळख आहे.आजही महाराष्ट्राच्या राजकारणात गंभीर परिस्थितीच्या वेळी भाऊंचा राजकीय सल्ला घेतला जातो. हे भाऊंचे मोठेपण मान्यच करावे लागेल. अनुभवातून समृद्ध होत जाणाऱ्या भाऊंकडे दांडगी स्मरणशक्ती, अफाट वाचन, अफाट व अचाट बुद्धिमत्ता, वाणीतील गोडवा आणि विश्वास होता. त्याचबरोबर प्रसंगावधान , समयसूचकता, हजरजबाबीपणा व अचूक निर्णयक्षमता हे पावरफुल गुण अंगी असल्यामुळे भारत देशात इंदापूरचे हर्षवर्धन पाटील असे नाव झाले आहे.
विधिमंडळात कामकाज करत असताना एक चमकता तारा म्हणून भाऊंकडे पाहिले जात होते. भाऊंना अनेकवेळा अनेक भूमिका एकाच वेळेस पार पाडाव्या लागत असत .आमदार असताना विनाकारण निर्माण होणारे अनेक कटुतेचे प्रसंग भाऊ सहज सोडवत असत.भाऊंचे सर्वपक्षीय आमदारांसोबत सलोख्याचे संबंध होते .सर्वसामान्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला भाऊंमुळे मिळालेल्या समाधानकारक उत्तर हे लोकांच्या चेहऱ्यावर दिसत असे. हे जनता कधीच विसरू शकणार नाही. सरकार येईल किंवा जाईल ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. विकासाची सर्वसामावेशक दृष्टी असलेला हा नेता नावाप्रमाणेच हर्ष म्हणजे आनंद देणारा आहे.आनंद वाढविणारा आहे.विचारांना- विचारांनी ,तत्वांना- तत्वांनीच उत्तर देणारा आहे. त्यामुळे नावाप्रमाणेच हर्ष उल्हासित करणारा हा नेता पाहिल्याबरोबर माणसाच्या मनामध्ये ‘आपला माणूस- हक्काचा माणूस’ अशा प्रतिक्रिया ऐकताना आनंदाला भरती येते. पराक्रमाची ज्योत काळजात पेटवावी लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा अनेक जबाबदाऱ्या, अनेक भूमिका समर्थपणे पार पडल्यामुळेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाऊंचे नाव येत होते. ही भाऊंच्या उत्तम कार्याची पोहच म्हणावी लागेल . विरोधक सुद्धा भाऊंवरती टीका करताना शंभर वेळा विचार करायचे .सत्ता ही डोक्यात जाऊ द्यायची नाही. सत्तेचा वापर हा नेहमी सर्वसामान्यांच्या हिताकरता करायचा. ही कर्मयोगी भाऊंची शिकवण आजही साहेबांना ऊर्जा देते. असा संघर्ष योद्धा सुरुवातीला अपक्ष, काँग्रेस व आता भाजप सरकारमध्ये आपले नाव टिकवून आहे. याचे कारण परंपरा, विश्वास आणि निष्ठा या तीन गोष्टींशी भाऊंचे एक नातं आहे. दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असणाऱ्या इंदापूर तालुक्याचे सुजलाम सुफलाम करण्यामध्ये भाऊंचे खूप मोठे योगदान आहे . त्यामुळेच ‘जुन्या लोकात चमकेल’ आणि ‘नव्या लोकात झळकेल’ असे तेज या इंदापूरच्या राजवैभवात आहे .असे हे भारदस्त, प्रभावी व परिणामकारक व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर लवकरात लवकर जाणे ही काळाची गरज बनली आहे . कारण एवढा व्यासंगी नेता, एवढा अभ्यासू नेता ,सर्वसामान्यांचा नेता आगामी काळात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाईल.इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय श्री हर्षवर्धन जी पाटील साहेब यांना ६१ व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !शब्दांकन: प्रा.नवनाथ गाडे
Home Uncategorized इंदापूर तालुक्याची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्माण करणारा नेता हर्षवर्धन पाटील… वाढदिवसानिमित्त विशेष...