वैभव पाटील:प्रतिनिधी
शुक्रवार दि. 09 सप्टेंबर रोजी गिरीज शाळेत अनुदानित खाजगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर संघटना वसई तर्फे 37 वा शिक्षक गौरव दिन संपन्न मोठा दिमाखात पार पडला .या कार्यक्रमाला वसई धर्मप्रांत शिक्षण मंडळ चे संचालक फा. प्रदीप डाबरे अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे फ्रँसिस डिमेलो व मायकल गोंसालवीस (माध्यमिक पतपेढी चे समन्वयक अध्यक्ष )उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले की आजच्या बदलत्या परिस्थितीनुसार व नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघटित होऊन व सर्व मतभेद विसरून एकत्र काम करणे गरजेचे आहे. कारण बदलत्या काळामध्ये माध्यमिक विनाअनुदानित शाळांची परिस्थिती व खाजगी शाळांची परिस्थिती अतिशय बिकट होत आहे. त्यासाठी येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारचे मार्गदर्शन पर भाषण मायकल सरांनी केले.
या कार्यक्रमात विस शिक्षकांच्या गुणवंत मुलांचा व 25 वर्ष सेवा झालेल्या पाच शिक्षकांचा तसेंच चार सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान सदर प्रसंगी करण्यात आला. कवी फेलिक्स डीसोजा ह्यांचा पी.एच.डी मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर एडवीन डाबरे यांना त्यांच्या कार्याबद्दल कल्याणकारी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पतसंस्थेमार्फत सभासदांना बक्षीस देण्यात आले. तुळीज एडुकेशन ट्रस्ट प्राथमिक शाळा नालासोपारा च्या वैशाली जोशी मॅडम यांनी सूत्रसंचालन केले तर संध्या नाईक मॅडम यांनी पसायदान सादर केले. सेट जोसेफ नंदाखाल शाळेतील शिक्षकांनी स्वागत गीत व गास शाळेतील शिक्षकांनी प्रार्थनागीत सादर केले.स्नेह भोजन ने कार्यक्रम ची सांगता झाली.