निमगाव केतकी:पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून मागील वर्षी निमगाव केतकी येथील बारवकरवस्तीवर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षी आंब्याची झाडे जोपासणाऱ्या महिलांना पुढच्या वर्षी पैठणी साडी देण्याचा शब्द भरणे कुटुंबाच्या वतीने देण्यात आला होता. दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करण्यासाठी भरणे कुटुंबाच्या वतीने मधुकर भरणे यांनी ५३ महिलांना पैठणी देऊन दिलेला शब्द पाळला.गेल्या वर्षी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ५३ व्या वाढदिवसा निमित्त फ्रेंड्स ऑफ नेचरच क्लबचे सदस्य ॲड. सचिन राऊत यांनी ५३ महिलांना केशर आंब्याच्या रोपांचे वाटप केले होते. या वेळी भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे यांनी ज्या महिला या झाडांचे वर्षभर चांगले संगोपन करतील त्यांना पुढच्या वर्षीच्या वाढदिवसादिवशी पैठणी साड्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल असे आश्वासन दिले होत ते पार पाडण्यात आले. या वेळी बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, संजय सोनवणे, वनक्षेत्रपाल अजित सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा छाया पडसळकर हस्ते सर्व ५३ महिलांना पैठणीचे वाटप केले.या वेळी निमगाव केतकी ग्रामपंचायतीचे मा.सरपंच व विद्यमान सदस्य तात्यासाहेब वडापुरे, लक्ष्मण हरणावळ, बाबासाहेब भोंग, संतोष राजगुरु, संदीप भोंग, ग्रामपंचायत सदस्य मनीषा बारवकर, सुरेश बारवकर, संदीप बारवकर, तुषार शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक ॲड. सचिन राऊत व ॲड. श्रीकांत करे यांनी केले. सूत्रसंचालन संजय म्हस्के यांनी केले व आभार माणिक भोंग यांनी मानले.