वरिष्ठांचे आदेश असतानाही गावगाड्याच्या राजकारणामुळे भोगवटदार नोंद केली जात नसल्याने कौठळीचा युवक करणार 15 ऑगस्टला स्वतंत्र दिनी अज्ञात ठिकाणी आत्मदहन..वाचा सविस्तर..

इंदापूर:18 जुलै 2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने गोरगरिबांसाठी एक चांगला निर्णय घेतला यामध्ये अतिक्रमीत किंवा अवैद्य जागेवर जरी तो गरीब माणूस रहात  किंवा व्यवसाय असेल तरी भोगवटदारी त्याची नोंद लावण्याचा जीआर शासनाचा झाला आहे व त्यानुसार त्या जागेचा कर वसूल करण्याचा लेखी आदेश दिला आहे आणि त्यानुसार गावागावांमध्ये जागेच्या नोंदी होण्यास सुरुवात झाली.
परंतु या भोगवटदार सदराखाली नोंदी करताना गावगाड्याच्या राजकारणामध्ये गोरगरीब कसा भरडला जातो याचा एक उत्तम उदाहरण इंदापूर तालुक्यातील कौठळी या गावांमध्ये पाहायला मिळाले.कौठळी गावामध्ये साहेबराव पिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार कौठळी गावामध्ये साहेबराव पिसाळ यांचे वडील वाल्मीक पिसाळ यांची अर्धा गुंठे जागा भोगवटदार सदराखाली नोंद करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला होता व त्या संदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तो प्रस्ताव मंजुरीही झाला होता. बिडीओ साहेबांनी या जागेची प्रत्यक्षात पाहणी करून ग्रामपंचायतला ही जागा अधिकृत करत नोंद लावून घेण्याचे आदेशही दिले होते परंतु गावगाड्यामध्ये हा गरीब भरडला गेल्याने त्याची नोंद झाली नाही.यानंतर साहेबराव पिसाळ यांनी बीडीओ साहेबांच्या ऑफिसचे उंबरे झिजवले.वारंवार भेट घेऊन पुन्हा एकदा आदेश काढण्याचे विनंती केली त्यानुसार आत्तापर्यंत तीन ते चार वेळा आदेश काढून झालेले आहेत परंतु ग्रामपंचायत या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे.साहेबराव पिसाळ यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या धन दांडग्या लोकांनी राजकीय दबावाचा वापर करत शासनाच्या एक-एक एकर जागा नावावर करून घेतल्या आहेत परंतु आमच्यासारख्या गोरगरिबांची अर्धा गुंठे जागा सुद्धा चार चार वेळा आदेश होऊनही नावावर होत नाहीत त्यामुळे आमच्या पिसाळ कुटुंबावर खूप मोठा अन्याय होत आहे आणि या अन्याविरोधात पिसाळ कुटुंबीय यांनी कोर्टात धाव घेतली होती. परंतु बिडीओ यांनी मध्यस्थी करत गोड बोलून व ती जागा नावावर करून देतो या खात्रीने कोर्टातील केस काढून घ्यायला सांगितले पिसाळ यांनी विश्वासाने ती केस माघारी घेतली परंतु अद्यापही त्यांनी जागा नावावर करू दिली नाही.
जर वरिष्ठांचे आदेश गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक पाळत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात बिडीओ यांनी प्रस्ताव दाखल करावा असे साहेबराव पिसाळ यांनी बिडीओ ला विनंती केली परंतु बिडीओ साहेब यांच्यावर राजकीय लोकांच्या दबावापोटी कोणत्याच प्रकारचे कारवाई करत नाहीत.मुळात ग्रामसेवक निलंबित होऊन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य या कामी अपात्र ठरत आहेत. त्यामुळे यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव त्वरित मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात यावा यासाठी आता सध्या साहेबराव पिसाळ पाठपुरावा करत आहेत परंतु बिडिओ साहेब तेही काम करायला तयार नाहीत आणि या सर्व त्रासाला वैतागून साहेबराव पिसाळ यांनी 15 ऑगस्ट या स्वतंत्र दिनाच्या पवित्र दिवशी आपण आत्मदहन करणार आहोत असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राहुलजी मखरे यांना निवेदन दिले आहे.
पिसाळ यांच्या या उदाहरणावरून खेडोपाडी राजकारण किती खालच्या दर्जाचे चालू आहे असेच लक्षात येते म्हणून प्रशासनाने यासाठी त्वरित 15 ऑगस्ट च्या आधी रीतसर नोंद केली पाहिजे तरच लोकशाही या शब्दावर गोरगरिबांचा विश्वास बसेल.



आत्मदहनाचे ठिकाण सांगणार नाही- साहेबराव पिसाळ: याबाबत साहेबराव पिसाळ यांना आत्मदहनाचे ठिकाण कोणते? असा प्रश्न केला असता साहेबराव पिसाळ यांनी सांगितले की, “मी जर ठिकाण लगेच सांगितले तर मला प्रशासन तिथे येऊन आत्मदहनापासून प्रवृत्त करतील, त्यामुळे मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करणार व आत्मदहनाच्या काही वेळापूर्वीच मी हे ठिकाण सांगणार आहे जेणेकरून यंत्रणा येण्यापर्यंत माझा मृत्यू झाला असेल.



नोंद लावण्याचे काम करणार आहे- विजयकुमार परिट (बिडीओ)- याबाबत विजयकुमार परीट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार आहोत त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीला नोंद लागली आहे परंतु भोगवटदार म्हणून नोंद लागणे बाकी आहे असा खुलासा केला.



Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here