वरकुटे बु. गावाला निधी कमी पडू देणार नाही – माजी राज्यमंत्री आमदार दत्तामामा भरणे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा भरणे मामा कडून सत्कार..

वरकुटे बू. ता.इंदापूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वच्या सर्व सदस्यांनी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली असून भरणे यांनी त्यांचा सत्कार केला आहे. शनिवार दि.६ रोजी वरकुटे बू. येथील दोन्ही गटातील विजयी झालेल्या ९ सदस्यांनी भरणेवाडी येथे माजीमंत्री भरणे यांची भेट घेतली.यावेळी बोलताना भरणे म्हणाले,या तालुक्याचे आमदार आपण असून तुमच्या गावाला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही.यापूर्वी तुमच्या गावाच्या विकासासाठी आपण मोठा निधी दिला असून येणाऱ्या काळातही चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. यावेळी भरणे यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला.यावेळी नितीन सोनवणे,राहुल घुले,रवींद्र देवकर,लक्ष्मण चीतळकर,अशोक शिंदे,सचिन करे,हरिदास करे,दिलीप देवकर व नवनाथ चितळकर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here