इंदापूर प्रतिनिधी: रत्नाई फाउंडेशनच्या वतीने राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवाजी विद्यालय बावडा येथे संपन्न झाला. या स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा परिषद सदस्या आणि इस्माच्या सहअध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन पवनराजे घोगरे व सचिन सावंत यांनी केले.
व्यक्तीच्या सादरीकरणाला अधिक महत्त्व असल्याने शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धेतील सहभागाने ही कला अधिक चांगल्या प्रकारे अवगत करता येत असल्याने विद्यार्थ्यांचा या स्पर्धेतील सहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी उपसरपंच निलेश घोगरे, कुरवली विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश घोरपडे, बावडा विद्यालयाचे मुख्याध्यापक दशरथ घोगरे, प्रतिक घोगरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवनराजे घोगरे यांनी केले. आभार सचिन सावंत यांनी मानले.