इंदापूरातील साठेनगर व बारामती चौकात ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ स्थलांतरित करा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांना तक्रारी करणार- शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सीमा कल्याणकर.

👉 शासनाने चालू केलेल्या योजनांचा गरिबांसाठीच उपयोग व्हावा याचाच विचार करा – सीमा कल्याणकर.
इंदापूर: आज शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने इंदापूर तालुका आरोग्य अधिकारी पोळ मॅडम यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात शासनाने गोरगरिबांसाठी चालू केलेला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा सोनई नगर सारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत व तहसील ऑफिस समोरील निर्जन ठिकाणी न चालू करता साठे नगर व बारामती चौक या भागात सुरू करावा अशी मागणी शिवसेना महिला अधिकाऱ्यांनी केली आहे. इंदापूर शहरातील गोरगरिबांसाठी व त्यांना शासन देत असलेल्या योजना अधिकारी वर्ग व्यवस्थित रित्या राबवत नसेल तर रस्त्यावर उतरायला ही महिला कमी करणार नाहीत असाही घणाघात सीमा कल्याणकर यांनी केलासाठेनगर व बारामती चौक या भागात गोरगरीब व मजूर लोकांची संख्या ज्यादा आहे त्यामुळे शासनाने चालू केलेल्या या योजनेचा त्यांना निश्चित गोरगरिबांना फायदा होईल असे मत शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सीमा कल्याणकर यांनी मत व्यक्त केले. या योजनेत रात्री दहापर्यंत या दवाखान्यांमध्ये रुग्ण तपासणी करण्यात येईल तसेच त्यांना मोफत औषधोपचार केला जाणार आहेत. तसेच गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी, लसीकरण, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, मानसिक आरोग्य विषयक समुपदेशन तसेच आवश्यकतेनुसार विशेषज्ञांच्या संदर्भ सेवा सल्ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर या केंद्रात टेलिकन्सल्टन्सी सुरु करण्याचाही आरोग्य विभागाचा मानस आहे आणि म्हणूनच ही योजना योग्य ठिकाणी असणे आवश्यक आहे.आगामी काळात या निवेदनाचा सकारात्मक विचार केला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई होण्यासाठी मुख्यमंत्री यांना भेटून तक्रार केली जाणार आहे अशी माहिती जनता एक्सप्रेस मराठी न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना सीमा कल्याणकर यांनी दिली.त्यामुळे येणाऱ्या काळात शासन खरोखरच उच्चभ्रू  व निर्जन भागातून हा दवाखाना उचलून करून गरजू लोकांच्या भागात स्थलांतरित करेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सीमा कल्याणकर,महिला तालुका अध्यक्ष रूपाली रासकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख अँड आनंद केकाण,शहर अध्यक्ष अशोक देवकर,शहर संघटीका ज्योती शिंदे,उपशहर संघटीका सोनम खरात इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here