इंदापुर: आज मंगळवार दि.22/03/2022 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मा.रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार व पुणे जिल्हा अध्यक्षा मा.सीमाताई भालसेन यांच्या अध्यक्षतेखाली इंदापुर तालुका महिला आघाडीची पुनरबंधानी शासकीय विश्रामगृह, इंदापूर येथे करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षपदी श्रीमती मनीषा ताई चंदनशिवे यांची एकमताने निवड करण्यात आली.प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे जिल्हा कायदेशीर सल्लागार ऍड. बापूसाहेब साबळे, जिल्हा सचिव आयु.हनुमंत तात्या कांबळे व पुणे जिल्हा सल्लागार आयु. सागर लोंढे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सीमाताई भालसेन म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडी ही शोषित, वंचित, पीडित सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष आहे.तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या अडीअडचणीना वाचा फोडण्याचे काम वंचित बहुजन महिला आघाडीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगितले.
पुणे जिल्हा कायदेशीर सल्लागार ऍड.बापुसाहेब साबळे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी ही महिला आघाडी पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना वेळोवेळी कोणत्याही समाजपयोगी कामात मदत करेल असे आश्वासन दिले.जिल्हा सचिव आयु.हनुमंत तात्या कांबळे यांनी सांगितले की, प्रत्येक समाज्यातील महिला यांच्या अडीअडचणीच्या काळात पूर्ण ताकतीने, महिला आघाडीला विश्वासात घेऊन कामे केली जातील तसेच त्याचा योग्य तो मान सन्मान केला जाईल. पुणे शहर प्रवक्ते मिलिंद सरवदे यांनी देखील मार्गदर्शन केले.
यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी पुणे जिल्हा महासचिव प्रियांका ताई लोंढे, उपाध्यक्षा मालती ताई बडेकर, जेष्ठ मार्गदर्शक हमीद भाई अत्तार, तालुका संपर्क प्रमुख सिद्धार्थ साळवे, तालुका उपाध्यक्ष हनुमंत बनसोडे, तालुका संघटक पंकज बनसोडे, निहाल भाऊ गायकवाड, अभिजित जगताप, बाळासाहेब घाडगे, राहुल सोनवणे,आबा चंदनशिवे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन प्रमोद भाऊ चव्हाण तर आभार मनीषा ताई चंदनशिवे यांनी मानले.