इंदापूर: अवघी दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात मात्र खूप मोठी झेप घेतली. लेखणी आणि प्रतिभेच्या बळावर त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. सिद्धहस्त कादंबरीकार, लोकशाहीर म्हणून त्यांना समाजात आजही मानाचे स्थान आहे असे मत इंदापूर तालुका भाजपा युवा मोर्चाचे कोअर कमिटी प्रमुख राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की,त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ठ कांदबरीचा पुरस्कार मिळालेला आहे. यासोबतच त्यांच्या अनेक कांदबऱ्या प्रसिद्ध आहेत. एवढंच नाही तर त्यांचे साहित्य चौदा भारतीय भाषा आणि इंग्रजी, जर्मन, रशियन अशा अनेक परदेशी भाषेतही प्रसिद्ध आहे.आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा,कादंब-या,पोवाडा,लावण्या, वग लिहिणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अणाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन आहे त्यांना मी विनम्र अभिवादन करतो असेही ते म्हणाले.शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर प्रचंड निष्ठा ठेवत संयुक्त महाराष्ट्र चळवळीत क्रांतीची ठिणगी पेटवणारे, आपल्या अभिजात लेखनाने समाजातील कष्टकरी, शोषित, उपेक्षित, पीडितांच्या व्यथा, वेदना मांडण्याचे काम साहित्यसम्राट, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे असे मत राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
Home Uncategorized लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात देशाचे नाव उंचावले- राजवर्धन...