लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुर्डूवाडी मध्ये मोफत रक्त तपासणी व होमिओपॅथी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शेरे म्हैसुर टिपु सुलतान सामाजिक संस्था प्रणित इंसानियत फाऊंडेशनच्या वतीने मोफत रक्त तपासणी व होमिओपँथी उपचाराचे शिबिर घेण्यात आले, या शिबिराचे उद्घाटन माढा वेल्फेअरचे अध्यक्ष धनराज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, या शिबिरात ५५५ जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोदंवला.यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक हनुमंत वाघमारे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहसीन मकणू ,राष्ट्रवादी शहराध्यक्ष दत्ताजी काकडे ,रेलकामगार सेनेचे वाहेद शेख ,उमरसाब दारूवाले, महेश गांधी, हाजी मोहम्मदहनीफ शेख, हाजी उस्मान चिस्ती, डॉ.आशिष राजपूत, किसन हनवते, वसीम मुलाणी ,लक्ष्मण भोंग ,मोहन झुंझुर्डे, अखलाक दाळवाले, रावसाहेब मुसळे ,सोमनाथ सलगर ,दिलीप उकरंडे ,संदीप पाटील, नीता खटके ,मंगल ढवळे ,हाज्जू शेख, रफीक शेख ,अल्ताफ पठाण, रफीक सय्यद, अकील दाळवाले ,राम पाले, अरमान शेख, अरमान पठाण ,अकीब पटेल, संतोष कदम, कैफ दाळवाले, मोहम्मद शेख आयुब शेख ,अमर शेख, आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रकाश किर्वे व आभार डॉ.मोहसीन मकणू यांनी मानले.डॉ.मोहसीन मकणू यांनी स्थापन केलेल्या इंसानियत फाउंडेशनचे कार्य पाहून धनराज दादा शिंदे यांनी २५००० रुपये ची आर्थिक मदत केली ,तसेच गोरगरिबांच्या हॉस्पिटल खर्चासाठी जी मदत संस्था करत करत आहे ते कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here