प्रतिनिधी : महेश सूर्यवंशी
दौंड, तालुक्यातील भांडगाव येथील शेतमजूर सिताराम शेळके यांच्या तेरा वर्षाचा मुलगा वैभव याला जन्मजात असलेल्या असती व्यंगामुळे चालता येत नव्हते त्याच्या कुटुंबीयांनी दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याशी संपर्क साधला आणि कुल यांच्या प्रयत्नामुळे पुणे येथील रुग्णालयात चार लाखांचे शस्त्रक्रिया यशस्वी झाले उपचार नंतर तो पायावर उभा राहू शकला
आमदार राहुल कुल हे वैभवच्याच नव्हे तर शेळके कुटुंबाच्या आयुष्यात आरोग्यदूत ठरले आहेत या योगदानाबद्दल शेळके कुटुंबीयांनी कुल यांचे आभार मानले भांडगाव येथील सिताराम शेळके यांची बेताचे आर्थिक परिस्थिती आहे या शेतमजूर कुटुंबाला पैसे अभावी जन्मजात अपंग असलेल्या वैभव ला उपचार करणे शक्य होत नव्हते या कुटुंबीयांची अडचण लक्षात घेऊन कुल यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आमदार राहुल कुल यांना भेटण्याचा सल्ला दिला त्यानंतर शेळके कुटुंबियांनी कुल यांची भेट घेऊन मदतीची विनंती केली आमदार राहुल कुल यांनी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयामध्ये वैभवला उपचारासाठी दाखल केले यांनी दवाखान्यात दिलेल्या सूचना व आवाहनाचा परिणाम असा झाला की चार लाख रुपयांची शस्त्रक्रिया मोफत यशस्वी झाली या उपचारानंतर वैभव पहिल्यांदा त्याच्या पायावर उभा राहिला.
आमदार राहुल कुल यांच्या पत्नी भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुल यांनी नुकतीच वैभवची भेट घेऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस केली वैभव त्याच्या पायावर उभा पाहताना त्याच्या आईचा आनंद आवरणीय होता वैभव लवकर पूर्णपणे बरा व्हावा व त्याला उत्तम आरोग्य लाभावे अशी सदिच्छा कांचन कुल यांनी केली.