लोकनेते कै.शहाजीराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी केसरी कुस्ती आखाड्याचे नियोजन.

👉 नीरा भीमा कारखान्यावरती शहाजी केसरी कुस्ती आखाड्याचे शनिवारी आयोजन – हर्षवर्धन पाटील
👉 पै.सिकंदर शेख व पै.प्रीतपाल फगवारा (पंजाब) यांच्या कुस्तीकडे राज्याचे लक्ष!
इंदापूर : प्रतिनिधी दि.20/2/2023
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या शहाजी आखाडा या कुस्ती मैदानावरती लोकनेते कै.शहाजीराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी केसरी कुस्ती आखाड्याचे शनिवारी (दि.25) दुपारी 2 वा. आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
या कुस्ती आखाड्यामध्ये शहाजी केसरी किताबासाठी कुस्ती सध्या राज्यात गाजत असलेला महान भारत केसरी पै.सिकंदर शेख विरुद्ध देशातील नामांकित मल्ल पंजाब केसरी पै.प्रीतपाल फगवारा (पंजाब) यांच्या मध्ये होणार असून, या लक्षवेधी लढतीकडे महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच यावेळी महाराष्ट्र चॅम्पियन पै. हर्षद ( माऊली) कोकाटे विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै.हर्षवर्धन सदगीर, पै. महारुद्र काळेल विरुद्ध पै. शुभम सिदनाळे, पै. दादा मुलाणी विरुद्ध पै. वैभव माने, पै.कालिचरण सोलनकर विरुद्ध पै. आशिष वावरे, पै. मामा तरंगे विरुद्ध पै.मनीष रायते, पै. नामदेव कोकाटे विरुद्ध अमित सूळ आदी अनेक नामांकित पैलवानांच्या निकाली कुस्त्या होणार आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
कुस्ती ही महाराष्ट्राची शान असून, कुस्ती परंपरेचे जतन व्हावे व कुस्तीगिरांना प्रोत्साहन मिळावे, याहेतूने आता प्रत्येक वर्षी कै.शहाजीराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिनी दि.25 फेब्रुवारीला शहाजी कुस्ती केसरी आखाड्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तरी शहाजी केसरी कुस्त्यांचा जंगी आखाडा पाहणेसाठी इंदापूर तालुक्यातील व परिसरातील नागरिक, कुस्तीगीर, कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड.कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, जबीन जमादार, कार्यकारी संचालक राम पाटील उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here