लाखेवाडी ता. इंदापूर गावात संत भगवान बाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना.

👉 बाबांच्या पुण्यतिथी विनम्र अभिवादन करून गावातील तरुणांनी एकत्रित येत मंदिर केले उभा,येणाऱ्या भविष्य काळात होणार मंदिराचा कायापालट.
इंदापूर : प्रतिनिधी
सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्यासाठी लाखेवाडी ता. इंदापूर येथे राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिराची स्थापना करण्यात आली आहे व येणाऱ्या भविष्यकाळात एक भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी उभे राहील असा विश्वास गावातील तरुणांना आहे. त्यामुळे संत हे एका समाजापुरते नसून ते सर्व जातीभेदला नष्ट करून सर्वांना बरोबरीने घेऊन जाणारे व त्यांच्यापुढे आदर्श ठेवणारे असे सर्वच महान संत आपल्या या भूमीमध्ये होऊन गेले त्यापैकीच राष्ट्रसंत भगवान बाबा हे एक होते.
राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्याचीच प्रचिती म्हणून एक समाजापुढे आदर्श निर्माण व्हावा व सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्यासाठी लाखेवाडी ता इंदापूर येथे राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिराची स्थापना करण्यात आली आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here