लहान मुलांचे आवडता खाऊ “बांबू” यावर इंदापूर तालुक्यातील महिलाराज असलेल्या या ग्रामपंचायतीने काढली विक्रीवर बंदी.

इंदापूर: शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आवडणारी,जिभेला चमचमीत लागणारा व अगदी स्वस्तात मिळणारा बांबू हा खाऊ.अगदी आकर्षक दिसायला, तिखट आणि मध्यम तिखट असे दोन प्रकार त्याच्यात असल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत याला विशेष मागणी आहे.काही वर्षापासून आपण जुली म्हणजेच बॉबी खात होतो,परंतु आता त्याचेच नवीन वर्जन बांबू मध्ये झालेले आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून सर्व किराणा स्टोअर्स ,पानपट्टी व इतरही ठिकाणी हा बांबू अगदी सहजरीत्या उपलब्ध होतो. पण हा बांबू खाल्ल्याने लहान मुलांच्या शरीरावर परिणाम होतोय हे लक्षात आल्यानंतर इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर १ या ग्रामपंचायतने बांबू खाऊ विक्रीवर महाराष्ट्रात प्रथमच बंदी घातल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली आहे. या ग्रामपंचायतीवर महिलाराज आहे, गावच्या सरपंच सौ. सोनाली संदीप जाधव व उपसरपंच सौ. विमलताई तुकाराम पांडुळे व इतर सगळे विद्यमान ग्रामपंचायतचे सदस्य तथा काही जाणकार व्यक्ती यांनी या बांबूची माहिती काढली असता ,याद्वारे लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांनाही यापासून हानी पोहोचू शकते हे निदर्शनास आले, त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक म्हणून ज्यावेळी या बांबूला जाळण्यात आले ,त्यावेळी एक प्रकारे प्लास्टिकचे वस्तू जाळल्या प्रमाणे त्याचा साचा फक्त शिल्लक राहिला.यावरूनच ग्रामपंचायतीच्या कमिटीने बांबू विक्रीवर बंदी घालून सर्व दुकानदारांना याबाबतची नोटीस काढण्यात आली. त्यामुळे आता इतरही ग्रामपंचायत कालठण नंबर १ च्या ग्रामपंचायत सारखे अनुकरण करतात का हे काही दिवसात समजेल. कालठण नंबर १ चे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,व गावकऱ्यांचेही लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या बांबू बंदी केल्यामुळे सर्वांचे विशेष कौतुक होताना दिसत आहे. जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना कालठण नंबर १ च्या कर्तव्यदक्ष सरपंच म्हणाल्या की ,आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून या लहान मुलांच्या आरोग्यास खेळणाऱ्या बांबू खाद्यपदार्थाला आपल्या गावात बंदी घालण्याचे ठरवले आणि तसा ग्रामपंचायत मध्येही ठराव केला आणि सर्व गावांमधील किराणा दुकान, पान टपरी यांना नोटीस देऊन बजवून सांगितले की ,इथून पुढे बांबू हा खाऊ विक्रीसाठी ठेवू नका नाहीतर तुमच्यावर कारवाई केली जाईल.त्यावरून आज कालठण मध्ये कोणत्याही दुकानांमध्ये टपरीमध्ये बांबू हा खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवलेला तुम्हाला कोठेही दिसणार नाही. कालठण नंबर १ च्या ग्रामपंचायत सारखे इंदापूर तालुक्यातील बाकी ग्रामपंचायती बांबू खाऊ विक्रीवर बंदी घालतात का हेच आता बघणे महत्वाचे आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here