लहानांपासून वृद्धापर्यंत वन उद्यानाचा आनंद लुटता येणार – माजी वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे,वनउद्यान भरणेवाडीचे लोकार्पण उत्साहात संपन्न.

👉वन उद्यानामुळे भरणेवाडीचे नाव राज्यभर गेले
इंदापूर:राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना वन विभागाच्या माध्यमातून,भरणेवाडी येथे वन उद्यानाची योग्य जागेवर निर्मिती करण्यात आली.लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्व नागरिकांना, पर्यटकांना,हे वन उद्यान सफर करताना आनंद देईल.मात्र आपला परिसर आपला भाग,वन उद्यानाच्या बरोबरीने स्वच्छतेने नटलेला असावा अशी अपेक्षा माजी वनमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली.
वनउद्यान भरणेवाडी(तालुका इंदापूर) चे लोकार्पण माजी वनमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बुधवारी पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशालीताई पाटील होत्या.यावेळी सारिकाताई भरणे,पुणे वन विभागाचे सहाय्यक वनरक्षक आशुतोष शेंडगे, इंदापूर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील,तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,जिल्हा नियोजन समितीचे सचिन सपकळ,युवक नेते नवनाथ रुपनवर,भरणेवाडी चे सरपंच आबासाहेब भरणे,कांतीलाल भरणे,स्वातीताई भरणे, गावच्या उपसरपंच विजयाताई मस्के,यांच्यासह परिसरातील नागरिक वन विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी राज्यमंत्री भरणे म्हणाले की,कोणतीही व्यक्ती पदावर असताना पद नसते मिळवायचे नसते.तर ज्या जनतेमुळे पद मिळाले आहे त्या पदाचा वापर जनतेच्या कल्याणासाठी समाजसेवेसाठी करायचा असतो, हे सूत्र तालुक्याचा आमदार झालेल्या पहिल्या दिवसापासून वापरतो,म्हणूनच तालुक्यातील विकास कामे झाली आहेत प्रगती पतावर आहेत.मात्र ही विकासाची कामे करत असताना फळाच्या झाडावर अनेक जण दगडे मारतात. याची कधी चिंता केली नाही,म्हणूनच जनतेने नोंद घेईल अशी विकास कामे निर्माण झाले आहेत याचाच एक भाग म्हणून भरणेवाडी सारख्या छोट्या वनपरिक्षेत्रात वन उद्यान आदर्शवत उभारले आहे.अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.गावोगावी चांगल्या कामाची कदर करणारी जनता असतेच याबद्दल शंका नाही.मात्र उलटा सल्ला देणारे सल्लागार असतात.अशा सल्लागारांपासून आगामी काळात जनतेने सावध राहावे.पूर्वीची भरणेवाडी व आताची भरणेवाडी खूप मोठा विकासात्मक बदल झालेली दिसते.आगामी काळात या परिसरात पर्यटकांचा वावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे प्रगतीचा मार्ग या भागाला मिळेल असा आशावाद आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
वन विभागाने या परिसरात वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केले आहे.त्यामुळे वन उद्यान भ्रमंती करत असताना झाडांची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे.विविध प्रकारचे वन्य प्राणी या परिसरात वावर असतो यांना कोणताही धोका इजा पोचू नये.याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे,निसर्गाच्या सानिध्यात हे वनउद्यान उभारल्याने भरणेवाडी चे नाव या माध्यमातून राज्यभर पोहोचणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांनी उपस्थितांचा सन्मान केला तर आभार वनपरिक्षेत्राधिकारी अजित सूर्यवंशी यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here